न्यायिक वृत्त
‘मोक्का’ मधून आरोपींची निर्दोष मुक्तता,कोपरगावातील घटना
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राहाता तालुक्यातील साकुरी येथील हॉटेल बांबू हाऊस वर सन-२०१७ साली पडलेल्या दरोड्या प्रकरणी साकुरी येथील आरोपी दिपक अंबादास पोकळे,किशोर दंडवते रा.साकुरी व दादू मोरे रा.शिर्डी आदींना कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मोक्का) मधून निर्दोष मुक्तता केली असल्याची माहिती आरोपीचे वकीलांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
दरम्यान याच गुन्ह्यात अन्य आरोपी किशोर दंडवते रा.साकुरी व दादू मोरे रा.शिर्डी आदी दोन आरोपींना याच खटल्यातून निर्दोष मुक्त केले असल्याची माहिती आरोपीचे वकील अड्.जयंत जोशी व अड्.बी.एन.गंगावणे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,साकुरी येथील आरोपी दिपक अंबादास पोकळे,किशोर दंडवते व दादू मोरे यांचे विरुद्ध साकुरी शिवारातील,’हॉटेल बांबू हाऊस’ मध्ये दि.१९ नोव्हेंबर २०१७ रोजी दरोडा टाकल्याचा आरोप करण्यात आला होता.या प्रकरणी राहाता तालुक्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यासाठी आरोपी विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३९७,३९२,३४ मोक्का कलम ३(१)२,३(२)३(४) व भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५)४(२५)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी करून दोषारोप पत्र दाखल केले होते.त्या नुसार कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सदर मोक्का खटल्याचे कामकाज सुरु होते.त्या खटल्यात एकूण फिर्यादी पक्षातर्फे १८ साक्षीदार तपासण्यात आले होते.मात्र त्यात सरकारी पक्ष कोणत्याही कलमानव्ये गुन्हा सिद्ध करू शकला नाही असा दावा अड्.धोर्डे,अड्.जयंत जोशी,अड्,बी.एन.गंगावणे आदींनी केला आहे.
आरोपीने शस्र धारण करून दरोडा टाकलेला नाही फिर्यादीने दिलेले मुद्दे व कलम १६४ अंतर्गत दिलेलं जबाबात बऱ्याच प्रमाणात तफावत आढळल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली आहे.व न्यायालयीन जाबजबाबात विसंगती आढळून आल्याच्या दावा केला आहे.फिर्यादीच्या सांगण्यावरून तसेच दिलेल्या साक्षीदारांच्या जबाबानुसार घडलेली नाही असे निदर्शनास आणून दिले होते.आरोपीने बाळगलेले हत्यार त्याच्या पासून केलेली जप्ती या मध्ये विसंगती आढळून आलेली आहे.आरोपीनी संघटित गुन्हेगारीतून कोणतीही स्थावर जंगम मिळकत मिळवली नाही.तसेच मोक्का अंतर्गत दिलेली मंजुरी कशी चुकीची आहे.हि बाब न्यायालयाचे निदर्शनास आणून दिली आहे.सदर आरोपी हा घटनास्थळी नव्हता असा दावा करण्यात आला होता.फिर्यादीचे म्हणण्या प्रमाणे त्याने कोणताही गुन्हा केला नाही.त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणताही सहभाग नव्हता असा दावा केला होता.त्यामुळे ‘मोक्का’ अंतर्गत असा गुन्हा शाबीत झालेला नाही.त्यामुळे आरोपीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात असा खटला पहिल्यांदा चालला असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान या प्रकरणी आरोपी दीपक पोकळे याचे वतीने अड्.शंतनू धोर्डे,तर किशोर दंडवते याचे वतीने अड्.जयंत जोशी,तर दादू मोरे याचे वतीने अड्.गंगावणे आदींनी काम पाहिले आहे तर फिर्यादी व सरकारी पक्षाच्या वतीने अड्.श्री.पाणगव्हाणे यांनी काम पाहिले आहे.जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना निर्दोष सोडल्या प्रकरणी आरोपीनीं समाधान व्यक्त केले आहे.