न्यायिक वृत्त
‘त्या’ चोरट्यांना पोलीस कोठडी,कोपरगाव न्यायालयातील घटना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या टोळीकडून १३ दुचाकींसह तब्बल ८ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपीस अटक करून कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी बी.बी पंडित यांचे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कोपरगाव येथील पोलीस अधिकाऱ्यांनी कोपरगाव येथील न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या गुंह्यातील आरोपीनी अद्याप किती दुचाक्या चोरल्या आहात याचा खुलासा होणार आहे.या घटनेकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.दरम्यान आज यावर पुन्हा सुनावणी होऊन त्यांना न्यायिक कोठडी सुनावली असल्याची ताजी माहिती प्राप्त झाली आहे.
कोपरगाव तालुक्यात दुचाकी चोरांचा सुळसुळाट झाला असून यात अनेक कोऱ्या गाड्या पळवून नेत आहेत.त्यामुळे शहरातील दुचाकीस्वारात भीतीचे वातावरण निर्माण झाले असतांना कोपरगाव शहर पोलिसांना नुकतीच एक गोपनीय खबर मिळाली होती.त्यात दोन इसम कोपरगाव नजीक ईशान्येस शिंगणापूर नजीक असललेल्या औद्योगिक वसाहत कोपरगाव येथे चोरीच्या दुचाकी विक्री करण्यासाठी येणार आहे.यावर पोलीस निरीक्षक देसले यांनी आपले पोलीस कर्मचारी यांना घेऊन सदर ठिकाणी सापळा लावला होता.रात्रीच्या सुमारास औद्योगिक वसाहत संवत्सर शिवारातून दोन ईसमांस ताब्यात घेतले होते.यामध्ये किशोर साहेबराव कापसे (वय-२१ वर्ष) व सचिन अंबादास कापसे (वय- २०) रा.तागडी नांदगाव,जिल्हा-नाशिक यांच्याकडून सुमारे तब्बल तेरा दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.हस्तगत केलेल्या दुचाकीत हिरो-होंडा,बजाज,बुलेट आदी कंपनीच्या गाड्यांचा यामध्ये समावेश होता.यातील आरोपीनी अद्याप किती चोऱ्या केल्या आहेत याचा खुलासा होणे गरजेचे आहे.त्यामुळे पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान यातील आरोपीना काल कोपरगाव येथील पोलीस अधिकाऱ्यांनी कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधीकारी बी.बी.पंडित यांचे न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.या गुंह्यातील आरोपीनी अद्याप किती दुचाक्या चोरल्या आहात याचा खुलासा होणार आहे.या घटनेकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान आज यावर पुन्हा सुनावणी होऊन त्यांना न्यायिक कोठडी सुनावली असल्याची ताजी माहिती प्राप्त झाली आहे.दरम्यान या गुन्ह्याचा पुढील तपास वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहे.