न्यायिक वृत्त
कोपरगाव दरोड्यातील…’त्या’आरोपींना पोलीस कोठडी

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्वेस साधारण सहा कि.मी.अंतरावर असलेल्या संवत्सर शिवारात नऊ चारी नजीक रहिवासी असलेले शेतकरी अनिल हरिभाऊ सोनवणे यांच्या वस्तीवर दि.१५ सप्टेंबर च्या पहाटे १.३० च्या सुमारास ६-७ जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने चाकुसारख्या हत्याराचा धाक दाखवून अंदाजे २ लाख ८१ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणात नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी कारवाडी येथील संशयित आरोपी दिलीप विकास भोसले,वेस येथील आरोपी अनिल अरुण बोबडे,जेऊर पाटोदा येथील आरोपी राहुल दामू भोसले आदींच्या मुसक्या आवळल्या असून त्यांना कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायमूर्ती वर्ग-१ न्या.पंडित यांचे समोर हजर केले असता त्यांना दि.२६ सप्टेंबर रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तर अद्याप अन्य चार साथीदार मात्र पळून गेले आहे.त्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.
दरम्यान संवत्सर येथील अनिल सोनवणे यांच्या वस्तीवरील दरोड्यातील तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वर्ग-१ न्या.श्री पंडित यांचे समोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण तिन्ही आरोपीना दि.२६ सप्टेंबर पर्यंत १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात चोरट्याचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला आहे.आधी राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील पती-पत्नी मे महिन्यात निर्घृण खून केल्यानंतर तीन महिन्यांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील दांपत्याची हत्या झाली होती.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली होती.या दोन्ही गुन्ह्यानंतर यात सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे.अशीच घटना दि.१५ सप्टेंबरच्या पहाटे १.३० वाजेच्या सुमारास संवत्सर शिवारात अनिल सोनवणे यांच्या वस्तीवर घडली असून सदर कुटुंब आपले नियत कर्म करून चौदा सप्टेंबरच्या रात्री झोपी गेले असताना रात्री एकच्या सुमारास सहा ते सांतवं चोरट्यांनीं शस्राचा बळावर घरात प्रवेश करून घरमालक सोनवणे यांच्याशी झटापट केली होती.त्यात घरमालक सोनवणे व त्यांची पत्नी कविता सोनवणे,भावजयी सुनीता बबन सोनवणे,आई सुगंधाबाई सोनवणे आदींना जखमी केले होते.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर दरोड्यातील अटक केलेले तीन आरोपी पोलीस अधिकारी अनिल कटके व त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत दिसत आहेत.
दरम्यान या झटापाटी नंतर घरातील रोख ७ हजार रकमेसह २ लाख ८१ हजारांचा ऐवज लांबवला होता.त्यात ७ हजारांची रोख रक्कम त्या नंतर दोन भ्रमणध्वनी अंदाजे किंमत ७ हजार ५०० रुपये,विविध दागिने त्यात १ लाख ११ हजारांचे सोन्याचे गंठण,पाच ग्रॅम सोन्याचे बिस्कीट,पाच ग्रॅम सोन्याची अंगठी,तीन ग्रॅम सोन्याच्या रिंगा,दोन ग्रॅम मंगळसूत्र,१२ ग्रॅम सोन्याची चैन,वीस ग्रॅम मोहनमाळ,दोन तोळे सोन्याचे गंठण,आदी सोन्या-नाणे आदीं चीजवस्तूची बॅग चोरट्यानी पळवली होती.मात्र गेलेला माल जवळ पास बारा लाखांचा असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान हि घटना कोपरगाव शहर पोलिसांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी सकाळी ३.४० च्या सुमारास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी आपल्या सहकाऱ्यासंमवेत धाव घेतली आहे.तर तत्पूर्वी दोन पोलीस कर्मचारी दुचाकीवर घटनास्थळी हजर झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्या नंतर सकाळी सदर ठिकाणचा पंचनामा केला आहे.त्या ठिकाणी श्वान पथकास पाचारण केले असून संशयितांना शोधण्याची मोहीम सुरु केली होती.पोलिसांनी संशयितांचे छायाचित्रे दाखविल्यावर फिर्यादी कुटुंबाने यातील काही संशीयतांना ओळखले होते.त्या नंतर पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव ठाण्यात फिर्यादी कविता अनिल सोनवणे (वय-५०) रा.संवत्सर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा पूर्ण तपास केल्यानंतर उशिरा दाखल केला होता.पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीं याची गंभीर दखल घेऊन श्वान पथक आणूनही आरोपींचाच छडा लावण्याचा प्रयत्न सुरु केला होता व कारवाडी येथील आरोपी दिलीप भोसले यावर लक्ष केंद्रित केले होते.त्याचा घरी पोलिसांनी धाड टाकली असता तो घर सोडून पळून जाऊ लागला होता.त्याला ताब्यात घेतले असता पोलिसांनी आपला पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली होती.त्या नंतर पोलिसांनी वेस येथील आरोपी अनिल बोबडे,राहुल दामू भोसले आदीं आरोपींना ताब्यात घेतले होते.
दरम्यान यातील आरोपी दिलीपा भोसले यावर नगर येथील पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल असून अनिल बोबडे याचे विरुद्ध ठाणे,पुणे,मुंबई रेल्वे,या ठिकाणी जबरी चोरी,राहाता,स्वारगेट,पुणे,मुलुंड,बांद्रा,रेल्वे आदी ठिकाणी दरोड्याची तयारी,आदी स्वरूपाचे सतरा गुन्हे दाखल आहे.
दरम्यान तर तिसरा आरोपी राहुल भोसले याचे विरुद्ध नगर,संभाजीनगर आदी ठिकाणी जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.आता अन्य चारच चोरट्याने पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.
दरम्यान वरील तिन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी वर्ग-१ न्या.श्री पंडित यांचे समोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण तिन्ही आरोपीना दि.२६ सप्टेंबर पर्यंत १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.