न्यायिक वृत्त
कोपरगावातील ‘त्या’आरोपींना पोलीस कोठडी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव खुर्द ग्रामपंचायत हद्दीत गोळीबार केलेल्या घटनेतील प्रमुख आरोपी विशाल सुनील भालेराव या चुलत दिराकडून संशयित रित्या गावठी कट्यातून सुटलेल्या गोळीतून महिला सुनीता संजय भालेराव (वय-४५) हि जागीच ठार झाल्याच्या घटनेतील अटक केलेला प्रमुख आरोपी विशाल भालेराव व अमोल भालेराव यास कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी.डी.पंडित यांच्या समोर हजर केले असता न्यायालयाने ११ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तर सिद्धार्थ भालेराव हा आरोपी अद्याप फरार आहे.
अटक दोन आज शिर्डी पोलिसांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी.डी.पंडित यांच्या समोर आज हजर केले असता सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभीयोक्ता एस.ए.व्यवहारे यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.तर आरोपीच्या वतीने अड्.एन.आर.कातकडे यांनी युक्तिवाद केला होता.दोन्ही पक्षाची बाजू ऐकून न्यायालयाने दोन्ही आरोपीना ११ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,विशाल भालेराव व संजय भालेराव हे चुलत भाऊ असून ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे मागे रहिवासी आहेत.मयत महिला सुनीता भालेराव व आरोपी यांचे चुलत दीर भावजय असे नाते आहे.सदर आरोपी विशाल भालेराव हा गवंडी काम करत असून त्याचे आपले चुलत भाऊ आणि भावजय यांचेकडे जाणे येणे होते.दि.०७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास अज्ञात ठिकाणाकडून आणलेल्या गावठी कट्टयातून अनावधानाने त्यातील गोळी सुटून त्यात आरोपीची भावजय भावजयीच्या डोक्यातून आरपार गेली होती.त्यात सदर महिला जागेवर कोसळली होती.तिला शिर्डी येथे उपचारार्थ दाखल केले असता दुपारी सदर महिलेचे निधन झाले होते.
या घटनेनंतर घटनेतील प्रमुख आरोपी विशाल भालेराव व सिद्धार्थ भालेराव,अमोल भालेराव आदीनीं पुरावा नष्ट करण्यासाठी सदर कट्टा व गोळ्या घेऊन जागेवरून फरार झाले होते.मात्र त्याचा शोध घेऊन त्यास पोलिसांनी त्यांना त्याच दिवशी गजाआड केले होते.त्यातील दोघें विशाल भालेराव व अमोल भालेराव याना अटक केली होती.तर यातील एक आरोपी सिद्धार्थ भालेराव हा फरार आहे.घटना स्थळावरून शिर्डी पोलिसांनी गोळीबार केल्या नंतर बाहेर पडणारी पितळी पुंगळी जप्त केली होती.
दरम्यान या घटनेतील आरोपी विरुद्ध फिर्यादी महिलेचा मुलगा कल्पेश संजय भालेराव याने गुन्हा क्रं. ३२७/२०२२ भा.द.वि.कलम ३०४,२०१,३४ प्रमाणे आरोपी विशाल सुनील भालेराव,सिद्धार्थ भाऊसाहेब भालेराव,अमोल दिनकर भालेराव सर्व रा.पोहेगाव आदी विरुद्ध दाखल केला होता.व यातील सिद्धार्थ भालेराव वगळता दोन आरोपी गजाआड केले होते.
त्यांना आज शिर्डी पोलिसांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी बी.डी.पंडित यांच्या समोर आज हजर केले असता सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभीयोक्ता एस.ए.व्यवहारे यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.तर आरोपीच्या वतीने अड्.एन.आर.कातकडे यांनी युक्तिवाद केला होता.दोन्ही पक्षाची बाजू ऐकून न्यायालयाने दोन्ही आरोपीना ११ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.तर सिद्धार्थ भालेराव हा आरोपी अद्याप फरार आहे.त्याचा शिर्डी पोलीस शोध घेत आहे.पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे करीत आहेत.