न्यायिक वृत्त
…’त्या’ लाचखोर महिलेला एक दिवसाची पोलिस कोठडी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तहसील कार्यालयात न्यायालयाचे आदेशाने वारसांची नोंद करण्यासाठी अर्जदाराकडून तब्बल ०७ हजार रुपयांची साक्षीदारांसमोर लाच घेताना अटक केलेल्या महसूल सहाय्यक अंजना पंडीत पंडित पवार हिला आधी न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.त्यानंतर तब्बल ०४ दिवसांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने ५० हजारांचा जामीन मंजूर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे सदर महिलेला चांगलीच अद्दल घडली असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांना जेरीस आणणाऱ्या महसूल विभागातील अन्य लाचखोरांना चाप बसण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान याबाबत या महिलेने यापूर्वी न्यायालयाचे आदेश डावलले असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान या भ्रष्टाचारी महिलेचे अनेक प्रताप कोपरगाव येथील वकील संघाच्या अनेक सदस्यांनी आणि तालुक्यातील नागरिकांनी अनुभवले होतेच.त्याचा परिणाम असा झाला की याची चर्चा सर्वत्र पसरली होती.त्यामुळे सलग दोन ते तीन दिवस सदर महिलेचा जामीन अर्जावर चर्चा होऊन जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पाचव्या दिवशी तो मंजूर केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी इसमाने कोपरगाव येथील न्यायालयाकडे आपल्या वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता वाटप करण्यास अर्ज केला होता.तक्रारदार हे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नमुद मिळकतीचा वाटप तक्ता मंजुर करून ताबा देण्याचा आदेश तहसिलदार यांचेकडुन मिळवुन घ्यायचा होता.तसा आदेशही न्यायालयाने तो काही महिन्यापूर्वी पारित केला होता.मात्र सदर कामासाठी आपले हात ओले केल्याखेरीज कोणत्याही कामाला हातच लावायचा नाही असा दुर्गुण बाळगणाऱ्या आणि शपथ खालेल्या अंजना पवार या महसूल सहाय्यक महिलेने येथेही आपले हात ओले करण्याची वाट पाहिली आणि येथेच घात झाला होता.तक्रारदार इसमाने अनेक महिने वाट पाहून आणि चकरा मारूनही या असंवेदनशील महिलेने तक्रारदार इसमास जुमानले नाही.अखेर वैतागून सदर इसमाने नगर येथील लाच लुचपत विभागात धाव घेऊन आपली तक्रार दाखल केली होती.व या मुजोर महिलेला आपला हिसका दाखविण्याचा निर्णय घेतला होता.

दरम्यान या प्रकरणी लाच लुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक छाया देवरे यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन कोपरगाव गाठले आणि तक्रारदारास सदर रक्कम प्रक्रिया करून देण्यास सांगितले होते.त्यानुसार त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा लावला असता हे अंजना पवार नावाचे भ्रष्टाचारी भूत ०७ हजारांची लाच घेताना बाटलीत अलगत बंद झाले होते.पोलिस निरीक्षक देवरे यांनी यांचे शिर्डी येथे जाबजबाब घेऊन या प्रकरणी ०२ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर सदर संशयित आरोपी महिलेला कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर केले होते.मात्र न्यायालयाने या महिलेने न्यायालयाचे आदेश डावलण्याचे मोठे प्रताप आणि आततायी धाडस पाहून पहिल्या दिवशी पोलिस कोठडी सुनावली होती.त्यानंतर पाचव्या दिवशी जामीन अर्ज मंजूर केला असल्याची माहिती आहे.
दरम्यान याबाबत या महिलेचे यापूर्वी न्यायालयाचे आदेश डावलले असल्याचे उघड झाले आहे.दरम्यान या भ्रष्टाचारी महिलेचे प्रताप अनेक कोपरगाव येथील वकील संघाच्या अनेक सदस्यांनी आणि तालुक्यातील नागरिकांनी अनुभवले होतेच.त्याचा परिणाम असा झाला की याची चर्चा सर्वत्र पसरली असल्यास नवल नव्हते.त्यामुळे सलग दोन ते तीन दिवस सदर महिलेचा जामीन अर्ज दोन्ही बाजूंनी चर्चा होऊन जिल्हा आणि सत्र न्यायालयाने शेवटी ५० हजारांचा जामीन मंजूर असल्याचे माहिती आहे.त्यामुळे सदर महिलेला पोलिस कोठडीची हवा खावी लागली आहे.त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या महिलेचे प्रताप अनुभवले होते.त्या सर्वांनी न्यायालयाचे आदेशाचे जोरदार स्वागत केले आहे.असा भ्रष्टाचाऱ्यांना असेच शासन गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया न उमटली तर नवल होते.
दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्ती वाद ऐकून कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे न्या.डी.डी.अलमले यांनी आरोपी महिलेला पाचव्या दिवशी ५० हजारांचा जामीन मंजूर केला आहे.दरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने ॲड.शरद गुजर यांनी काम पाहिले असल्याची माहिती हाती आली आहे.तर आरोपी महिलेच्या वतीने ॲड.अनुप ठोळे यांनी काम पाहिले असल्याची माहिती हाती आली आहे.दरम्यान या महिलेला जामीन मिळण्यासाठी कोपरगाव महसूल मधील एका सहकाऱ्याने मोठी यातायात केली असल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे सर्वत्र उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.



