न्यायिक वृत्त
अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मधील छत्रपती बॉईज ग्रुपचे अध्यक्ष फैजल मन्सुरी यांच्यासह अनेक कार्यकर्ते व युवकांनी सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्षप्रवेश केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांचे भाजपच्या नेत्यांनी स्वागत केले आहे.

“या प्रभावी कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशामुळे कोपरगाव मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाली असून,त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा,व्यापक जनसंपर्काचा व स्थानिक प्रभावाचा आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला निश्चितच मोठा फायदा होणार आहे”-विवेक कोल्हे,अध्यक्ष,सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखाना.
कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी आता केवळ तीन दिवस उरले आहे.त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात मोठा गोंगाट दिसून येत असून सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले आहे.आरोपाच्या फेरी झडत आहे.त्या आरोपांना त्याच त्वेषाने उत्तर दिले जात आहे.विशेष म्हणजे यावेळी पहिल्या टप्प्यापेक्षा जास्त प्रचाराला वेग आला असल्याचे भासत आहे.त्यातले त्यात दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात व गटात घेण्यासाठी चढाओढ सुरू असून अनेकांनी देव पाण्यात बुडवले आहे.विरोधी पक्षाचे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला की प्रवेश केलेल्या पक्षात आनंदाच्या उकळ्या फुटताना दिसत आहे.विशेष म्हणजे यावेळी लोकसभेसारखे एकारलेले वातावरण असल्याचे दिसत नाही.भाजपच्या सावलीला उभे न राहणारे मुस्लिम कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करताना दिसत आहे.त्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान या प्रवेशात आफताफ मन्सुरी,मोहीज मन्सुरी,मोहसिन मन्सुरी,परवेज मन्सुरी,आरीष मन्सुरी,कय्युम मन्सुरी,इम्रान मन्सुरी,सोहेल मन्सुरी,आनीष मन्सुरी,रमिज मन्सुरी,वसीम मन्सुरी,फरान मन्सुरी,अमन मन्सुरी,शाहीद मन्सुरी,सलमान मन्सुरी,सतीश व्हाव्हळ,समीर मणियार,सलीम शेख,आसिफ शेख,अमन मणियार,शाहिद मणियार,योगेश त्रिभुवन, गणेश मोरे,नाना पेटारे,रामेश्वर मोरे,विपुल,मयूर लांडे,लक्ष्मण लांडे,सार्थक शेलार,विलास पवार,करण शिंदे,अनिल नरोडे,सतीश पटाईत,किशोर नरोडे,दिपक डोळस,अरमान शेख,किशोर बाचकर,वसीम खाटीक,एजाज पठाण,शाहिद तांबोळी,ऋषिकेश खरात,अनिकेत खरात,शाहिद बागवान,अतिक शेख,दत्तू सोळसे,अल्तमश बेग,अल्ताफ बेग, सचिन रोकडे,अमित सोळसे,सचिन सोळसे,मुसा शेख आदींचा समावेश आहे.प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे भाजपमध्ये स्वागत होत आहे.
या प्रसंगी दिलीपभाऊ दारुणकर,राजाभाऊ शिंदे,प्रशांत कडू,सोमनाथ मस्के,बाळासाहेब पवार,संपत चंदनशिव,भारत रोकडे,नवाब मन्सुरी,सलीम मन्सुरी,असलम शेख,बंटी कांबळे,अल्ताफ पठाण,सलीम पठाण,रोहित कणगरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



