न्यायिक वृत्त
न्यायासाठी लढणाऱ्या वकिलांचा गौरव हे समाजाचे कर्तव्य-खेमनर

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
वकील दिन हा समानता,न्याय आणि समाजसेवेसाठी लढणाऱ्या वकिलांच्या समर्पणाचे प्रतीक असून जे आवाजहीनांसाठी आवाज बनतात आणि समाजाला मदत करतात त्यांचा गौरव हे समाजाचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन कोपरगाव येथील प्रसिद्ध लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर यांनी नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

दरम्यान या वेळी,’हेल्पिंग हॅण्ड’ या संस्थेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षित,दुष्काळी तरुणांना उच्च शिक्षणासाठी विशेष मदत करणारे लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आणि अत्यंत प्रतिष्ठित वकील डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या स्मरणार्थ दरवर्षी वकील दिन साजरा केला जातो.वकिलांचा दिवस हा न्याय प्रशासनात कायदेशीर व्यावसायिकांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचे तसेच कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्याच्या त्यांच्या समर्पणाचे स्मरण करून देतो.कोपरगाव शहरात हा मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

सदर पसंती कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष ऍड.शरद गुजर,ज्येष्ठ विधिज्ञ ऍड.वाबळे,ऍड.मिलिंद गुजराथी,ॲड.जयंत जोशी,ऍड.शंतनू धोर्डे,सरकारी वकील बाबासाहेब पाणगव्हाणे,ऍड.सर्जेराव वाघ,ऍड.एम.पी.येवले,ऍड.सुयोग जगताप,ऍड.योगेश महाले,ऍड.शाम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आणि अत्यंत प्रतिष्ठित वकील डॉ.राजेंद्र प्रसाद यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 03 डिसेंबर 2023 रोजी वकील दिन साजरा केला जातो.वकिलांचा दिवस हा न्यायप्रशासनात कायदेशीर व्यावसायिकांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेचे तसेच कायद्याचे राज्य टिकवून ठेवण्याच्या त्यांच्या समर्पणाचे स्मरण करून देत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संयोजक डॉ.श्रीमाळी यांनी केले यावेळी त्यांनी,”समाजातील वकिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.“न्यायव्यवस्थेत आपल्या अशिलांना न्याय देण्यात वकीलांचे योगदान मोठे आहे.समाज त्यांच्या ऋणी आहे.कृतज्ञतेच्या भावनेतून हा सत्कार समारंभ आयोजित केला आहे,” असे त्यांनी नमूद केले.
यावेळी कोपरगावमध्ये वकील दिनानिमित्त येथील ज्येष्ठ वकील मंडळींचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला आहे.त्यांना सन्मानचिन्ह,शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
दरम्यान यावेळी विधी क्षेत्रात दीर्घकाळ उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल ज्येष्ठ विधिज्ञ ऍड.वाबळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. “उच्चशिक्षितांनी समाजातील गरजूंपर्यंत सेवा पोहोचवावी.कोपरगावची न्यायालयीन व्यवस्था आणि विधिज्ञ मंडळी हे शहराचे भूषण असल्याचे गौरवोद्गार त्यांनी शेवटी काढले आहेत.
यावेळी उपस्थित विधी तज्ञांचे आभार डॉ.आयुष श्रीमाळी यांनी मानले आहे.


