न्यायिक वृत्त
…’त्या’ गुन्ह्यातील सोनारासह चोरट्यांचा जामीन फेटाळला !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीच्या घटनांनी कहर केला असतानाच आता थेट कोळगाव थडी येथे एका सिव्हील इंजिनिअरच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी वीस लाखांहून अधिक किमतीच्या मुद्देमालावर हात साफ केला होता.यातील काही सहा आरोपींना पोलिसांनी गजाआड केले होते.या गंभीर घटनेतील आरोपी सोनार योगेश उदावंत व आरोपी महिला शीतल काळे यांचा जामीन अर्ज काल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री.तांबोळी यांनी रद्द केला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान पोलिसांनी गजाआड केलेले आरोपी कपिल पिंपळे,नंदू पिंपळे आदी आरोपी व चोरीचे सोने घेणारे सोनार हे सराईत असल्याचे उघड झाले असून त्या आरोपींच्या मोबाईलचा सी.डी.आर.तपासला असता त्यात वरील दोन सोनार आणि चोरट्यांमध्ये संवाद पोलिसांना सापडला असता त्यात सदर सुवर्णकार योगेश उदावंत याने चोरट्यांना,”चोरीचा माल दुसरीकडे नको तर आपल्याला विकत जा” असे आर्जव करताना दिसत आहे.
कोपरगाव तालुक्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढले आहेच पण चोरट्यांवर पोलिसांचा धाक असल्याचे दिसून येत नाही परिणानी चोरट्यांचे धाडस वाढत चालले आहे.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी या ठिकाणी दि.22 ऑक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती.यातील फिर्यादी अभियंता प्रमोद एकनाथ धामणे हे आपल्या नजिकच्या नातेवाईकांच्या लग्न समारंभासाठी पारनेर या ठिकाणी गेल्याची संधी साधत मध्यरात्री पाळत ठेवून चोरट्यांनी हे धाडस केले होते.या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत होती.

या घटनेत चोरट्यांनी शनिवारी मध्यरात्री बंगल्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता.घरातील फर्निचर कपाटातील लॉकर फोडून आत ठेवलेले 10 तोळ्याच्या बांगड्या, साडेआठ तोळ्याचे गंठण,5 तोळ्याची मोहनमाळ,अडीच तोळ्याच्या अंगठ्या,5 ग्रॅम कानातील टापसे यासह जवळपास 27 तोळे सोन्याचे दागिने असा जवळपास एकवीस लाखांचा ऐवज लंपास केला होता.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी पोलीस कर्मचार्यांसह तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला होता.तसेच अहिल्यानगर येथील गुन्हा अन्वेषण विभाग,फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशन टीम आणि श्वानपथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते.
याप्रकरणी कोपरगांव तालुका पोलीस ठाणे गुं. क्रं.331/2025 भारतीय न्याय संहिता कलम 305 (अ), 331(3),331(4) वाढीव कलम 317(2), 317(4).61(2) 3 अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू केला होता.त्यांना मिळालेल्या गुप्त खबरी नुसार त्यांनी त्यात सात आरोपी असल्याचे समजले होते.यांनी अवघ्या काही दिवसात सुरेगाव येथून पाच तर कोपरगाव येथील एक सोनार अशा सात आरोपींना जेरबंद केले होते.त्यात धारणगाव रोड,सम्यकनगर येथील दोन सुवर्णकार योगेश रविंद्र उदावंत (वय- 41 वर्षे) व महेश रवींद्र उदावंत आदीं दोघां भावांचा समावेश होता.यातील आरोपी महेश उदावंत फरार असल्याची माहिती चौकशी अधिकाऱ्यांनी दिली आहे तर अन्य आरोपींत कपिल राजु पिंपळे (वय-26),रा.मोतीनगर सुरेगांव,योगेश नंदु राजु पिंपळे (वय- 23 वर्षे) रा.मोतीनगर सुरेगांव,सोनु दशरथ शिंदे (वय- 25 वर्षे)रा.कारखाना गेट समोर,काळपेवाडी,रोहीत विशाल जगबन्सी (वय- 39 वर्षे ) रा.कोळगांव थडी,शितल दादा काळे (वय- 25 वर्षे) धंदा-मजुरी रा.सुरेगांव,एक महिला आरोपी शीतल काळे आदी सात आरोपींचा समावेश आहे.त्यांच्या मुसक्या तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी आवळल्या होत्या.त्याबाबत पोलिसांचे ग्रामस्थानी कौतुक केले आहे.
दरम्यान सदर सात आरोपींना काल कोपरगाव येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री तांबोळी यांनासमोर हजर केले असता आरोपीचे वकील नितीन गंगावणे आणि सरकारी वकील यांनी युक्तिवाद केला होता.सरकारी वकिलांनी आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने त्यांचे पुरावे पाहून योगेश उदावंत व शीतल काळे या दोन आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे.सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील उत्तम पाईक यांनी काम पाहिले होते.तर फिर्यादीच्या वतीने ॲड.सुयोग जगताप यांनी काम पाहिले होते.
दरम्यान पोलिसांनी गजाआड केलेले आरोपी कपिल पिंपळे,नंदू पिंपळे आदी आरोपी व चोरीचे सोने घेणारे आरोपी सराईत असल्याचे उघड झाले असून त्या आरोपींच्या मोबाईलचा सी.डी.आर.तपासला असता त्यात वरील दोन सोनार आणि चोरट्यांमध्ये संवाद पोलिसांना सापडला असता त्यात सदर सुवर्णकार योगेश उदावंत याने चोरट्यांना,”चोरीचा माल दुसरीकडे नको तर आपल्याला विकत जा” असे आर्जव करताना दिसत असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.हा घटनाक्रम अनेक वर्षापासून सुरू असल्याचे उघड झाल्याने न्यायालयाने या सुवर्णकाराचा जामीन अर्ज फेटाळला आहे.


