न्यायिक वृत्त
पत्नीच्या खूनातून आरोपीची निर्दोष मुक्तता…!

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भरतवाडी,वारी,येथील राहणारा आरोपी अमोल मारुती बोर्डे याने दि.२१ जुलै २०१९ रोजी दुपारी १.३० ते २.०० चे दरम्यान स्वतःच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिला कुऱ्हाडीने जीवे ठार मारल्याबाबत कोपरगाव येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्याची जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण करण्यात आली असून यातील आरोपी अमोल बोर्डे यास विविध सबळ पुरावे आणि साक्षी अभावी आरोपीस निर्दोष मुक्त केले असल्याची माहिती आरोपीचे वकील ॲड.अनुप ठोळे यांनी आमच्या प्रतिनिधी दिली आहे.

या खटल्यात आरोपी विरुद्ध सबळ पुरावा असल्याचा दावा करून गुन्हा सिद्ध करण्याकरिता सरकार पक्षाने अनेक साक्षीदार तपासले होते.ऍड.अनुप ठोळे यांनी आरोपीची बाजू न्यायालयासमोर मांडून आरोपी असलेला अमोल मारुती बोर्डे याची स्वतःच्या पत्नीस कुऱ्हाडीने मारल्याच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील रहिवासी फिर्यादी भानुदास मल्हारी मोरे यांची बहीण भरतवाडी,सविता मोरे हिचे लग्न सतरा वर्षापूर्वी वारी येथील अमोल मारुती बोर्डे यांचेशी झालेलं होते.मात्र सन -2018 पासून त्यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वादविवाद सुरू झाले होते.फिर्यादी घटनेच्या पूर्वी एक महिण्याआधी ही घटना कानावर आल्यावर त्याबाबत त्यांनी आरोपी मेहुण्यास समजावून सांगितले होते.मात्र त्याने काहीही फरक पडला नव्हता.
दरम्यान आरोपी अमोल बोर्डे याने अखेर आपल्या बहिणीस दि.दि.२१ जुलै २०१९ रोजी दुपारी १.३० ते २.०० चे दरम्यान तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला कुऱ्हाडीने जीवे ठार मारले होते.याबाबत आपल्याला मामे सासरे प्रभू पगारे यांचा फोन आला होता व “ती पाणी भरताना पडून जखमी झाली असून तिला शिर्डी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असल्याचे सांगितले” होते.याबाबत भानुदास मोरे आणि त्यांचे नातेवाईक रुग्णालयात आले होते.त्यांनी घटनास्थळी सदर महिलेची स्थिती पाहिली असता तिच्या मानेवर मोठा घाव आढळला होता.त्यातून त्याने तो खून कुऱ्हाडीचा सहाय्याने केल्याचे उघड झाले होते.त्याबाबत आरोपीचा मेहुणा भानुदास मोरे यांने कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा गु.र.नं.१०७/२०१९ भा.द.वि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान याबाबतच्या खटल्याबाबत आरोपी विरूध्द सबळ पुरावा असल्याने आरोपीच्या विरूध्द जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.सदर खटल्याचे कामकाज हे कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.डी.अलमले यांचे संपन्न झाले.या खटल्यात आरोपी विरुद्ध सबळ पुरावा असल्याचा दावा करून गुन्हा सिद्ध करण्याकरिता सरकार पक्षाने एकूण १२ साक्षीदार तपासले होते.आरोपी तर्फे ॲड.अनुप विजयकुमार ठोळे यांनी काम पाहिले होते.त्यांनी आरोपीची सक्षम बाजू न्यायालयासमोर मांडून आरोपी असलेला अमोल मारुती बोर्डे,रा.भरतवाडी,वारी,ता.कोपरगांव याची स्वतःच्या पत्नीस कुऱ्हाडीने मारून खून केले या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.

