न्यायिक वृत्त
शेताच्या बांधावरून मारहाण,03 आरोपींना 02 वर्षाची शिक्षा,02 हजारांचा दंड !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारात दोन भावांचा शेताचा बांध कोरल्यावरून 10 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 8.30 वाजता पाईप आणि काठ्यांनी तुंबळ मारहाण झाली होती त्यात फिर्यादी भाऊ सुभाष सिताराम येवले हा गंभीर जखमी झाला होता.त्याविरोधात कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एम.पी.बिहारे यांच्या न्यायालयात नुकतीच सुनावणी संपन्न झाली असून न्यायालयाने आरोपी भाऊ शिवाजी सिताराम येवले व त्यांची मुले अमोल येवले व तेजस येवले अशा तीन आरोपींना दोन वर्षाची शिक्षा व दोन हजारांच्या दंड ठोठावला असून दंडाची रक्कम न भरल्यास त्यांना तीन महिन्याची साधा कारावासाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

ब्राम्हणगाव येथील दोन भावांचा बांधाच्या कारणावरून झालेल्या भांडणात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी न्या.एम.पी.बिहारे यांनी आरोपी भाऊ शिवाजी सिताराम येवले व त्यांची मुले अमोल येवले व तेजस येवले अशा तीन आरोपींना दोन वर्षाची शिक्षा व 20 हजारांचा दंड झाला असून आरोपींनी दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
‘शेती’ म्हंटलं की भांडणं आलीच.मग ते कधी शेतजमीन वाटणीच्या मुद्द्यावरून होतात तर कधी एका शेतकऱ्याने दुसऱ्या शेतकऱ्याचा बांध कोरला म्हणून होत असतात. शेताचा बांध कोरणे ही अनेक शेतकऱ्यांसाठी जणू समस्याच बनली आहे.शेतीची मशागत करताना आजकाल सर्वत्र ट्रॅक्टरचा वापर केला जातो.ट्रॅक्टरने मशागत करताना नजरचुकीने किंवा जाणीवपूर्वक बांध कोरला जातो.तर बऱ्याच वेळेला जाणीवपूर्वक त्रास देण्याचे उद्देशाने अशी कृती करून भांडण करण्यात प्रवृत्त केले जाते.परिणामी यामुळे दोन शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होतात.त्यातून तंटे बखेडे निर्माण होतात.मग इच्छा असो वां नसो न्यायालयाची पायरी चढावी लागते.अशीच एक घटना दिनाक पाच वर्षापूर्वी कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव शिवारात 10 ऑक्टोबर 2020 रोजी घडली होती.ती अन्य कोणात नाही तर दोन भावात घडली होती.यातील फिर्यादी भाऊ सुभाष येवले हे आपल्या गत क्रं.587 मधील शेतात सकाळी 8.30 वाजता चक्कर मारण्यास गेले असता त्या ठिकाणी त्यांचा बांध कोरला असल्याचे लक्षात आले होते.
त्यांनी त्या ठिकाणी आपला भाऊ शिवाजी येवले यास हटकले होते व त्याचा जाब विचारला होता.याचा राग येऊन आरोपी भाऊ सुभाष येवले व त्याची मुले अमोल येवले व तेजस येवले आदींनी फिर्यादी इसम शिवाजी येवले यांना लोखंडी पाईप,काठ्या यांनी गंभीर मारहाण केली होती.त्यात त्यांचा डावा हात मोडला होता.त्यांना मारहाण केली असल्याची बातमी फिर्यादी सुभाष येवले यांचे मुलांना समजली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती.त्यांना पाहून आरोपी शिवाजी येवले व त्यांची मुले फरार झाली होती.जाताना त्यांना जीव मारण्याची धमकी दिली होती.त्यानंतर फिर्यादी सुभाष येवले यांच्या मुलांनी त्यांना तातडीने उपचारासाठी त्यांना कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले होते.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.498\2020 भारतीय दंड संहिता कलम 326,323,504,506,34 प्रमाणे आरोपी विरूध्द गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी याबाबत सदर खटला कोपरगाव येथील कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी याचे न्यायालयात 392\2020 अन्वये वर्ग केला होता.त्याबाबत दोन्ही गटांचे जाबजबाब नोंदवले होते.शिवाय साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते.याबाबत फिर्यादीत सरकारी पक्षाचे वतीने ऍड.प्रदीपकुमार रणधीर व सहाय्यक वकील राहुल शेळके यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.तर आरोपींच्या वतीने ॲड.एम.पी.येवले यांनी बचाव केला होता.
दरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी न्या.एम.पी.बिहारे यांनी आरोपी भाऊ शिवाजी सिताराम येवले व त्यांची मुले अमोल येवले व तेजस येवले अशा तीन आरोपींना दोन वर्षाची शिक्षा व 20 हजारांचा दंड झाला असून आरोपींनी दंड न भरल्यास तीन महिन्यांचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती ऍड.प्रदीपकुमार रणधीर यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली आहे.


