न्यायिक वृत्त
…’त्या’ वकिलाच्या कुटुंबातील चौघांचा अटक पूर्व जामीन मंजूर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथील रहिवासी व कोपरगाव येथील न्यायालयात आपली सेवा बजावत असलेले वकील गौरव गुरसळ यांचे विरूध्द पोलिस सेवेत उपनिरीक्षक पदावर आपले कर्तव्य बजावत असलेले मातोश्रीनगर राहुरी येथील वर्तमानात फिर्यादी दुर्गेश सुखलाल वाघ यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात शेतजमिनीत असलेले भिंत पाडली असल्याचे कारणावरून वकील गुरसळ यांचेसह त्यांची आई,वडील गंगाधर गुरसळ,मुलगा अनिरुद्ध गुरसळ,पत्नी मीनाक्षी गुरसळ असा पाच जणांवर एट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी वकील वगळता अन्य नातेवाईकांना कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला असल्याचे माहिती ऍड.दिलीप लासूरे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

फिर्यादिचे चुलते हे लष्करातून सेवानिवृत्त झाले असून त्यांनी आता पोलिसांत नोकरी मिळवली आहे.त्यांनी राहुरी आणि कोपरगाव या दोन ठिकाणी सरकारकडून सिलिंगची जामीन मिळवली आहे.विशेष म्हणजे त्यांनी आपल्या वडिलांचे चुकीचे नाव वापरून जामीन मिळवली आहे.सरकारी नोकरीत असणाऱ्या कोणाही इसमास अशी सीलिंग जामीन घेता येत नाही असा दावा करून ही सरकारी जमीन जमा करून घ्यावी अशी तक्रार केली होती.या घटनेविरोधात आरोपी ऍड.गौरव गुरसळ यांनी महसूल विभागात उपविभागीय अधिकारी शिर्डी यांचेकडे तक्रार केली आहे.त्याचे पुरावे त्यांनी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले आहे.तो युक्तिवाद ऐकून न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,”राहुरी तालुक्यातील रहिवासी असलेले फिर्यादी दुर्गेश वाघ आणि कोपरगाव येथील न्यायालयात आपली सेवा बजावत असलेले वकील गौरव गुरसळ यांची मुर्शतपूर शिवारात शेजारी शेजारी शेतजमीन आहे.त्यांचा गट क्रमांक 73\4 असा आहे.म्हणजेच ते दोघे बांधभाऊ आहे.त्यांच्यात आपापसात काही वर्षांपूर्वी समझोता होऊन त्यांनी आपल्या शेताच्या बांधावर एकत्र येऊन संमतीने भिंत बांधली होती.मात्र नंतर दि.20 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता आरोपी वकील गौरव गुरसल यांनी उत्खंकाच्या सहाय्याने चालकास सांगून तेथे हजर राहून आपली भिंत पाडली असल्याचा दावा केला होता.याबाबत त्यांना लक्ष्मीनगर येथील कमानी जवळ दुपारी 4.30 वाजता विचारणा केली असता त्यांनी आपल्याला जातीवाचक शिवीगाळ करून आपल्याशी झटापट केली असून त्यास त्यांचा मुलगा अनिरुद्ध गुरसळ आदींनी सहाय्य केले आहे.माझे खिशातील रोख रुपये 06 हजार रुपये काढून घेतले आहे.आपण या कृतीस विरोध केला असता.त्यांचे वडील गंगाधर गुरसळ,त्यांची पत्नी मीनाक्षी गुरसळ त्यांची आई पूर्ण नाव माहिती नाही आदींनी आपल्याला वाईटसाईट शिवीगाळ केली असल्याचा आरोप आपल्या फिर्यादीत केला होता.
दरम्यान याबाबत आरोपी वकील गौरव गुरसळ यांचे म्हणणे होते की,”आपण त्यावेळी समझोता करून भिंत बांधली होती.मात्र जमिनीची मोजणी केली आणि बांध सरकला तर एकमेकांनी तो समजुतीने सरकून घ्यायचा असा करार झाला होता.आपण या बाबत कोपरगाव भूमी अभिलेख विभागाकडून रितसर मोजणी केली असता सदर भिंत ही आपल्या जमीन हद्दीत आली होती.शिवाय ती धोकादायकरित्या कलली होती.त्यामुळे शेतात काम करणे व मशागत करणे अवघड व जोखमीचे बनले होते.त्यामुळे आपण कल्पना देऊन ही कृती केली असल्याचा दावा केला आहे व हा गुन्ह्याचा आरोप फेटाळला होता.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.501\2025 भारतीय न्याय संहिता कलम 329(1),329(3),324(5),119(1),352,189(2),190,अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलम 3(1)(जी),3(1)(आर)3(1)एस.3(2)(व्ही ए.)दाखल केला ऍड.गुरसळ यांचे विरूध्द गुन्हा दाखल केला होता.त्यामुळे एक समाजातील सदरक्षण करणारा व दुसरा कायद्याच्या परिपूर्ण न्यायाने जनतेला न्याय मिळवून देणारा घटक असताना त्यांचाच तंटा होतो आणि तोही एट्रोसिटीचा वापर करून.परिणामी याबाबत तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
दरम्यान याबाबत आरोपी ऍड.गुरसळ यांचे कुटुंबातील आई,वडील,पत्नी आणि मुलगा यांचा या प्रकरणी कोणताही संबंध नसताना त्यांना विनाकारण सुड भावनेने गोवले गेले असल्याचा दावा करून याबाबत कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात न्या.डी.डी.अलमले यांचे समोर अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी आरोपी गुरसळ यांचे वकील ॲड.दिलीप लासूरे यांनी अर्ज दाखल केला होता.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली असून त्यावेळी ऍड.लासूरे यांनी,ऍड.गुरसळ यांना जाणीवपूर्वक या गुन्ह्यात गोवले गेले असल्याचा आरोप केला आहे.वकील गौरव गुरसळ हे मुर्शतपूर येथील रहिवासी असून त्यांचे आई आणि वडील,पत्नी व मुलगा यांचा या प्रकरणात कोणताही समावेश नाही.खरे कारण वेगळे असून फिर्यादिचे चुलते हे लष्करातून सेवा निवृत्त झाले असून त्यांनी आता पोलिसांत नोकरी मिळवली आहे.त्यांनी राहुरी आणि कोपरगाव या दोन ठिकाणी सरकारकडून सिलिंगची जामीन मिळवली आहे.विशेष म्हणजे त्यांनी आपल्या वडिलांचे चुकीचे नाव वापरून जामीन मिळवली आहे.सरकारी नोकरीत असणाऱ्या कोणाही इसमास अशी सीलिंग जामीन घेता येत नाही असा दावा करून ही सरकारी जमीन जमा करून घ्यावी अशी तक्रार केली होती.या घटनेविरोधात आरोपी ऍड.गौरव गुरसळ यांनी महसूल विभागात उपविभागीय अधिकारी शिर्डी यांचेकडे तक्रार केली आहे.त्याचे पुरावे त्यांनी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले आहे.त्यामुळे या घटनेला वेगळे वळण मिळाले असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान या घटनेचा वाघ यांनी राग मनात धरून त्यांनी हा गुन्हा दाखल करून त्यांना यात गोवले असल्याचा दावा केला आहे.यात त्यांनी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 कलमांचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप केला आहे.अशा स्थितीत जे नातेवाईक घटनास्थळी उपस्थित नव्हते ज्याचा या प्रकरणाची काही संबंध नाही त्यांना यात होवून संबधित वाघ हे सूड उगवत असल्याचा आरोप केला आहे.त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायलयाने अनेक निवाडे त्यासाठी न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले आहे.त्यांनी पुरावे जिल्हा न्यायालयात सादर केल्याची माहिती त्यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.तर सरकारी फिर्यादीत वकील यांनी कलम 18 नुसार अटकपूर्व जामीन देण्याचा जिल्हा व सत्र न्यायालयास अधिकरण असल्याचा दावा केला होता.दरम्यान ऍड.लासूरे यांनी जिल्हा व सत्र न्यायालयास असा अधिकार असल्याचा युक्तिवाद गृहीत धरून जिल्हा व सत्र न्यायालयाने ऍड.गुरसळ यांची आई,वडील गंगाधर गुरसळ,मुलगा अनिरुद्ध गुरसळ,पत्नी मीनाक्षी गुरसळ असा चार जणांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.त्यामुळे ऍड.गौरव गुरसळ यांना न्यायालयातून मोठा दिलासा मिळाला असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान यात सरकारी पक्षाच्या वतीने अड.सोनवणे यांनी काम पाहिले तर आरोपीच्या वतीने ऍड,दिलीप लासु रे यांनी काम पाहिले आहे.


