जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

पी.ए.बाबत जिल्हा न्यायालयाचा कठोर निर्णय,पोलिसांच्या कृतीवर प्रश्नचिन्ह !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
  
    संपूर्ण नगर जिल्ह्यात चर्चेच्या स्थानी असलेल्या नवरात्री उत्सवात 25 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या हाणामारीत सामील असलेला प्रमुख आरोपी व आ.आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी गेली महिनाभर परागंदा होऊन जामीन घेण्याचा प्रयत्न करत असताना व उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याने व त्याच्या सर्व वाटा बंद झाल्याने अखेर अरुण जोशीसह त्याचा भाऊ राजेंद्र जोशी,पुतण्या शुभम जोशी,मयूर सुपेकर,साई सुपेकर आदी पाच आरोपींनी शहर पोलिसांपुढे सपशेल शरणागती पत्करली होती.त्याच्या जामिनासाठी त्यांचे वकील जंगजंग पछाडत असून आज सायंकाळी 5.30 वाजता कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणीत असून त्याचा जामीन अर्ज फेटाळला असल्याचे माहिती हाती आली आहे.त्यामुळे सत्ताधारी गटाला हा मोठा धक्का समजला जात आहे.

  

ऐन नवरात्रीत झालेल्या या गंभीर हाणामारी नंतर आरोपींनी कोणाकोणाशी संपर्क केला ही बाब उघड होणे गरजेचे आहे.यात राजकीय नेते असण्याची शक्यता वर्तवली आहे.अशा स्थितीत आरोपी एका जबाबदार पदावर काम करत असल्याने या तपासात मोठा अडथळा निर्माण होण्याच्या शक्यता वर्तवली आहे.आरोपीने पोलिस जबाबात आपण वापरलेली हत्यारे जमा केल्याचे म्हंटले आहे.अद्याप आरोपींची ओळख परेड बाकी आहे.त्यामुळे आरोपींचा सहभाग होता ही बाब गंभीर असल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी अरुण जोशी यांचे जबाबात उडवाउडवीची उत्तरे देतो लेखी सांगूनही पोलिस त्याकडे डोळेझाक कशी करू शकतात असा सवाल उपस्थित केला आहे.त्यामुळे अरुण जोशी याची सुटका झाली तर तो उघडपणे या प्रकरणात हस्तक्षेप करील,काही साक्षीदारांचे जबाब बाकी असल्याचा फिर्यादी पक्षाच्या वतीने ऍड.जयंत जोशी यांनी केला होता तो जिल्हा व सत्र न्यायालयाने गृहीत धरून आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात मागील महिन्यात दि.२५ सप्टेंबर रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास सत्ताधारी राष्ट्रवादीचे आ.काळे गट,मनसे विरूध्द शिवसेना (ऊ.बा.ठा.) गटात राहाता येथील इसमाने रस्त्यावरून गाडी घालण्याच्या कारणावरून दोन गटात तलवार,लोखंडी रॉड,क्रिकेटचे स्टंप,लाकडी काठ्या,दगड विटांनी तुंबळ हाणामारी होऊन मोठा राडा झाला होता.त्यात यमानाजी सुंबे व द्यानेश्वर भांगरे आदी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह विवेक राजेंद्र आव्हाड,गौरव सुनील मोरे,अविनाश नामदेव गीते,दत्तात्रय रंगनाथ पंडोरे,हिराबाई राजेंद्र आव्हाड तर दुसऱ्या गटातील सुनील योगेश गोर्डे,वनिता नारायण गोर्डे,आ.काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण बाजीराव जोशी,त्याचा भाऊ राजेंद्र बाजीराव जोशी,पुतण्या शुभम राजेंद्र जोशी आदी १० जण गंभीर जखमी झाले होते.यातील ४१ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता तर त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी अन्य १९ आरोपीवर असे एकूण ६० हून अधिक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.या हाणामारीचे स्वरूप इतके गंभीर होते.या प्रकरणी पोलिसांवर हात उचलण्याने पोलिस अधिकाऱ्यांनी ही बाब आधी गंभीर घेटली होती मात्र त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून पुन्हा बदल झाला असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे या प्रकरणात त्यांची मोठी कोंडी झाली असल्याचे समजत आहे.

   दरम्यान यातील काही आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली होती तर काही आरोपी नाशिक रोड कारागृहात खास सरकारी पाहुणचार घेत होते.अशा 18 आरोपींना म्हणजे 17 ऑक्टोंबर रोजी कोपरगाव येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.यातील प्रमुख आणि जबाबदार पद असलेली व्यक्ती आ.आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी त्याचा भाऊ राजेंद्र जोशी आणि त्यांचा पुतण्या शुभम जोशी आदी तीन जणांनी आधी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता.तो फोल ठरल्याने त्यांनी उच्च न्यायालयाची पायरी चढली होती.मात्र त्या ठिकाणी त्यांना मोठी चपराक मिळाली होती.त्यामुळे त्यांना आपला अर्ज मागे घ्यावा लागला होता.त्यामुळे त्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी फिरले होते.त्यामुळे त्यांना पोलिसांपुढे आपली शस्त्रे म्यान करण्यापलीकडे हाती काही उरले नव्हते.त्यामुळे जोशी आणि बंधूंनी रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी आपली शस्त्रे म्यान करून शरणागती पत्करली होती.दरम्यान या प्रकरणात पोलिसांवर वरिष्ठ स्तरावरून मोठा राजकीय दबाव आला असल्याचे मानले जात होते.त्यामुळे सदर आरोपी हजर होऊनही व त्यात अनेक कच्चे दुवे राहिले असतानाही पोलिसांनी थेट न्यायालयीन कोठडी मागितल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत होते.

  दरम्यान अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांचे समोर नुकत्याच संपन्न झालेल्या सुनावणीत कोपरगाव शहर पोलिसांनी या आरोपी बाबत थेट न्यायालयीन कोठडी मागितल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त झाले होते.न्यायलयाने याबाबत त्यांची रवानगी थेट नाशिक रोड येथील कारागृहात केली होती.त्यानंतर त्या विरोधात आरोपी जोशी यांचे वकिलाने जिल्हा व सत्र न्यायालयाचा दरवाजा खटखटावला होता.

   दरम्यान गेली दोन दिवस याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.डी.डी.अलमले यांचे समोर जामिनासाठी सुनावणी संपन्न झाली होती.त्यावर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता.त्याबाबत आज जिल्हा व सत्र न्यायालयाचे समोर फिर्यादीचे वकील जयंत जोशी यांनी जोरदार युक्तिवाद केला होता.

    त्याबाबत फिर्यादी पक्षाच्या वतीने आपली बाजू मांडताना ऍड.जयंत जोशी यांनी,”पोलिसांनी अद्याप आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून तपासणी करणे गरजेचे असल्याचे न्यायालयाचे लक्षात आणून दिले होते.यातील अनेक आरोपींचे हाडे दुभंगली आहे.यातील सोन्याची साखळी अद्याप जप्त झालेली नाही.आरोपींचा सी.डी.आर.अद्याप जप्त झालेला नाही.त्यामुळे या गंभीर हाणामारी नंतर आरोपींनी कोणाकोणाशी संपर्क केला ही बाब उघड होणे गरजेचे आहे.यात राजकीय नेते असण्याची शक्यता वर्तवली आहे.अशा स्थितीत आरोपी एका जबाबदार पदावर काम करत असल्याने या तपासात मोठा अडथळा निर्माण होण्याच्या शक्यता वर्तवली आहे.आरोपीने पोलिस जबाबात आपण वापरलेली हत्यारे जमा केल्याचे म्हंटले आहे.अद्याप आरोपींची ओळख परेड बाकी आहे.त्यामुळे आरोपींचा सहभाग होता ही बाब गंभीर असल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी स्विय सहाय्यक अरुण जोशी यांचे जबाबात उडवाउडवीची उत्तरे देतो लेखी सांगूनही पोलिस त्याकडे डोळेझाक कशी करू शकतात असा सवाल उपस्थित केला आहे.त्यामुळे अरुण जोशी याची सुटका झाली तर तो उघडपणे या प्रकरणात हस्तक्षेप करील असा दावा केला आहे.तरीही पोलिस या मुख्य आरोपीबाबत पोलिस कोठडी मागण्यांबाबत काकू करत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.त्यामुळे या प्रकरणात मोठा राजकीय हस्तक्षेप असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे आधी कठोर भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी आता नरमाईची भूमिका घेतली असल्याचे बोलले जात होते.आज हा निर्णय जाहीर झाला असून  जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.डी.डी.अल मले यांनी ऍड. जयंत जोशी यांचा युक्तिवाद गृहीत धरल्याचे उघड झाले आहे.व आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे.त्यामुळे सत्ताधारी गटाला मोठा हादरा मानला जात आहे.दरम्यान ताब्यात सत्ता असल्यावर काही ही करता येते या समजाला मोठा छेद गेला आहे.याचे नागरिकांनी जोरदार स्वागत केले आहे.

  दरम्यान आता सदर घटनेचे सर्व साक्षीदार आणि त्यांचे जबाब नोंदवल्यावर सदर आरोपींना जामीन मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.एरव्ही पोलिस ९० दिवसांच्या आत आपले चार्जशीट दाखल करतात.मात्र या विशेष प्रकरणी पोलीस अधिकारी घाई करणार की नेहमी प्रमाणे सोपस्कार करणार याकडे नागरिक आणि राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

   दरम्यान आज सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता ऍड.सोनवणे यांनी काम पाहिले आहे.तर फिर्यादी पक्षाच्या वतीने ॲड.जयंत जोशी यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे.तर आ.काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी यांचे वतीने ऍड.शिंदे यांनी काम पाहिले आहे.

                  ——————————-

*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.

https://bit.ly/newsseva2025

*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close