न्यायिक वृत्त
…’त्या’ अटक आरोपी बाबत उद्या निर्णय !पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात !

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
   संपूर्ण नगर जिल्ह्यात चर्चेच्या स्थानी असलेल्या नवरात्री उत्सवात 25 सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या हाणामारीत सामील असलेला प्रमुख आरोपी व आ.आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी गेली महिनाभर परागंदा होऊन जामीन घेण्याचा प्रयत्न करत असताना व उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळल्याने व त्याच्या सर्व वाटा बंद झाल्याने अखेर अरुण जोशीसह त्याचा भाऊ राजेंद्र जोशी,पुतण्या शुभम जोशी,मयूर सुपेकर,साई सुपेकर आदी पाच आरोपींनी शहर पोलिसांपुढे सपशेल शरणागती पत्करली असून त्याला कोपरगाव शहर पोलिसांनी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जानव्ही केळकर यांनी पोलिसांच्या मागणी (?) प्रमाणे न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.त्यामुळे जिल्हाभर आश्चर्य व्यक्त होत आहे.

दरम्यान अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांचे समोर नुकत्याच संपन्न झालेल्या सुनावणीत कोपरगाव शहर पोलिसांनी या आरोपी बाबत थेट न्यायालयीन कोठडी मागितल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.न्यायलयाने याबाबत त्यांची रवानगी थेट नाशिक रोड येथील कारागृहात केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहरात मागील महिन्यात दि.२५ सप्टेंबर रोजी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास सत्ताधारी राष्ट्रवादीचे आ.काळे गट,मनसे विरूध्द शिवसेना (ऊ.बा.ठा.) गटात राहाता येथील इसमाने रस्त्यावरून गाडी घालण्याच्या कारणावरून दोन गटात तलवार,लोखंडी रॉड,क्रिकेटचे स्टंप,लाकडी काठ्या,दगड विटांनी तुंबळ हाणामारी होऊन मोठा राडा झाला होता.त्यात यमानाजी सुंबे व द्यानेश्वर भांगरे आदी दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह विवेक राजेंद्र आव्हाड,गौरव सुनील मोरे,अविनाश नामदेव गीते,दत्तात्रय रंगनाथ पंडोरे,हिराबाई राजेंद्र आव्हाड तर दुसऱ्या गटातील सुनील योगेश गोर्डे,वनिता नारायण गोर्डे,आ.काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण बाजीराव जोशी,त्याचा भाऊ राजेंद्र बाजीराव जोशी,पुतण्या शुभम राजेंद्र जोशी आदी १० जण गंभीर जखमी झाले होते.यातील ४१ आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता तर त्यानंतर सरकारी कामात अडथळा आणला प्रकरणी अन्य १९ आरोपीवर असे एकूण ६० हून अधिक आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.या हाणामारीचे स्वरूप इतके गंभीर होते.या प्रकरणी पोलिसांवर हात उचलण्याने पोलिस अधिकाऱ्यांनी ही बाब गंभीर घेऊन जोशी बंधूंना आपला खास पाहूणचार घडवला असल्याचे बोलले जात आहे.यात पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक आरोपींचे अस्थिभंग झाला असल्याचे बोलले जात आहे.

“पोलिसांनी अद्याप आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून तपासणी करणे गरजेचे असल्याचे न्यायालयाचे लक्षात आणून देताना.यातील अनेक आरोपींची हाडे दुभंगली आहे.यातील सोन्याची साखळी अद्याप जप्त झालेली नाही.आरोपींचा सी.डी.आर.अद्याप जप्त झालेला नाही.त्यामुळे या गंभीर हाणामारी नंतर आरोपींनी कोणाकोणाशी संपर्क केला ही बाब उघड होणे गरजेचे आहे.यात राजकीय नेते असण्याची शक्यता वर्तवली आहे.अशा स्थितीत आरोपी एका जबाबदार पदावर काम करत असल्याने या तपासात मोठा अडथळा निर्माण होण्याच्या शक्यता आहे”-ऍड.जयंत जोशी,ज्येष्ठ विधीज्ञ,कोपरगाव कोर्ट.
दरम्यान यातील काही आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली होती तर काही आरोपी नाशिक रोड कारागृहात खास सरकारी पाहुणचार घेत होते.अशा 18 आरोपींना म्हणजे 17 ऑक्टोंबर रोजी कोपरगाव येथील न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.यातील प्रमुख आणि जबाबदार पद असलेली व्यक्ती आ.आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक अरुण जोशी त्याचा भाऊ राजेंद्र जोशी आणि त्यांचा पुतण्या शुभम जोशी आदी तीन जणांनी आधी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटक पूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे सदर नावे आरोपींच्या यादीतून काढण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी मोठी यातायात करूनही वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाम असल्याने स्विय सहाय्यक अरुण जोशी,राजेंद्र जोशी,शुभम जोशी आदींचे गुन्ह्यात आली होती.तरीही या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळावा या साठी नाशिक येथील विशेष वकिलाची नेमणूक करून त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालय येथे प्रयत्न केले होते.मात्र जिल्हा व सत्र न्यायालयाने तो अटकपूर्व जामीन फेटाळला होता.त्यामुळे त्यांचा मोठा अपेक्षाभंग झाला होता.त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेऊन त्या ठिकाणी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले होते मात्र त्या ठिकाणी ऐन दिवाळीत उच्च न्यायालयाने त्यांना थांग लागू दिला नव्हता.त्यामुळे त्यांच्या सर्व अपेक्षांवर पाणी फिरले होते.त्यामुळे त्यांना पोलिसांपुढे आपली शस्त्रे म्यान करण्यापलीकडे हाती काही उरले नव्हते.त्यामुळे जोशी आणि बंधूंनी रविवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी आपली शरणागती पत्करली होती.दरम्यान या प्रकरणात पोलिसांवर वरिष्ठ स्तरावरून मोठा राजकीय दबाव आला असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे सदर आरोपी हजर होऊनही व त्यात अनेक कच्चे दुवे राहिले असतानाही पोलिसांनी थेट न्यायालयीन कोठडी मागितल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.(असे सामान्य आरोपी बाबत वर्तन पोलिसांकडून बहुधा होत नाही)

दरम्यान गेली दोन दिवस याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.डी.डी.अलमले यांचे समोर जामिनासाठी सुनावणी संपन्न झाली असून त्यावर न्यायालय उद्या आपला निर्णय जाहीर करू शकते असे विधी तज्ज्ञांनी सांगितले आहे.
दरम्यान अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांचे समोर नुकत्याच संपन्न झालेल्या सुनावणीत कोपरगाव शहर पोलिसांनी या आरोपी बाबत थेट न्यायालयीन कोठडी मागितल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.न्यायलयाने याबाबत त्यांची रवानगी थेट नाशिक रोड येथील कारागृहात केली आहे.
दरम्यान गेली दोन दिवस याबाबत जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.डी.डी.अलमले यांचे समोर जामिनासाठी सुनावणी संपन्न झाली असून त्यावर न्यायालय उद्या आपला निर्णय जाहीर करू शकते असे विधी तज्ज्ञांनी सांगितले आहे.
दरम्यान या घटनेत शहर पोलिसांनी यातील आरोपी बाबत मोठ्या राजकीय दबावातून आपली भूमिका सौम्य केली असल्याचे मानले जात आहे.याबाबत फिर्यादी पक्षाच्या वतीने आपली बाजू मांडताना ऍड.जयंत जोशी यांनी,”पोलिसांनी अद्याप आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची कसून तपासणी करणे गरजेचे असल्याचे न्यायालयाचे लक्षात आणून दिले आहे.यातील अनेक आरोपींचे हाडे दुभंगली आहे.यातील सोन्याची साखळी अद्याप जप्त झालेली नाही.आरोपींचा सी.डी.आर.अद्याप जप्त झालेला नाही.त्यामुळे या गंभीर हाणामारी नंतर आरोपींनी कोणाकोणाशी संपर्क केला ही बाब उघड होणे गरजेचे आहे.यात राजकीय नेते असण्याची शक्यता वर्तवली आहे.अशा स्थितीत आरोपी एका जबाबदार पदावर काम करत असल्याने या तपासात मोठा अडथळा निर्माण होण्याच्या शक्यता वर्तवली आहे.आरोपीने पोलिस जबाबात आपण वापरलेली हत्यारे जमा केल्याचे म्हंटले आहे.अद्याप आरोपींची ओळख परेड बाकी आहे.त्यामुळे आरोपींचा सहभाग होता ही बाब गंभीर असल्याचे उघड झाले आहे.पोलिसांनी स्विय सहाय्यक अरुण जोशी यांचे जबाबात उडवाउडवीची उत्तरे देतो लेखी सांगूनही पोलिस त्याकडे डोळेझाक कशी करू शकतात असा सवाल उपस्थित केला आहे.त्यामुळे अरुण जोशी याची सुटका झाली तर तो उघडपणे या प्रकरणात हस्तक्षेप करील असा दावा केला आहे.तरीही पोलिस या मुख्य आरोपी बाबत पोलिस कोठडी मागण्यांबाबत काकू करत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.त्यामुळे या प्रकरणात मोठा राजकीय हस्तक्षेप असल्याचे मानले जात आहे.त्यामुळे आधी कठोर भूमिका घेणाऱ्या पोलिसांनी आता नरमाईची भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे.आता जिल्हा व सत्र न्यायालय याबाबत कोणता निर्णय घेणार ? आरोपी अरुण जोशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोडणार की त्यांना पोलिस कोठडी देणार याकडे कोपरगाव सह जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता शैलेश देसले यांनी काम पाहिले आहे.तर फिर्यादी पक्षाच्या वतीने ॲड.जयंत जोशी यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे.तर जोशी यांचे वतीने ऍड.शिंदे यांनी काम पाहिले आहे.दरम्यान कोपरगाव नगरपरिषद निवडणूक पूर्व हा अकाली शिमगा संपन्न झाला असल्याने आता मतदार याबाबत काय विचार करतात व आ.काळे विरोधक याचा कसा फायदा उचलणार हे लवकरच समजणार आहे.मात्र विरोधी कोल्हे गट मात्र शहर प्रमुख वैभव आढाव यांची एक प्रतिक्रिया वळगता थंड बस्त्यात गेला असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.मात्र सोशल मीडियावर याबाबत मोठा धुमाकूळ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.
————————-
*पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
 
					 
					 
					

