न्यायिक वृत्त
कर्जापोटी खोटा धनादेश,जामिनदारास शिक्षा

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरातील ज्योती सहकारी पतसंस्था यांचेकडून बाबुराव एकनाथ नरोडे यांनी घेतलेल्या कर्जाचे परतफेडीपोटी त्यांचे जामीनदार सुरेश बाबुराव नरोडे यांनी दिलेला रु.८ लाखाचा धनादेश न वटल्याने ज्योती पतसंस्थेने त्यांचेवर कोपरगांव येथील न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल केला होता त्यात आरोपीस बारा महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठावल्याने कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

यातील आरोपी जमीनदार सुरेश नरोडे याचे विरुद्ध कोपरगाव येथील न्यायालयात गुन्हा दाखल केला होता.त्यामध्ये चौकशीअंती आरोपी सुरेश बाबुराव नरोडे यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.परिणामी कोपरगांव येथील न्यायाधीश जी.डी.अग्रवाल यांनी आरोपीस १२ महिन्याचे साधा कारावासाची शिक्षा ठोठावली तसेच फिर्यादी ज्योती पतसंस्थेस रु.१५ लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला पारित केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”अपुर्या रकमेमुळे चेक परत आल्यास,निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत पोस्टाने चेक बाऊन्सची नोटीस लिखित स्वरूपात जारी करून रक्कम भरण्याची मागणी करावी लागते. खात्यातील अपुर्या रकमेमुळे बँक धनादेशाचे पैसे देऊ शकत नाही असे सांगणारा बँकेचा रिटर्न मेमो मिळाल्याच्या ३० दिवसांच्या आत प्राप्तकर्ता चेक बाऊन्स नोटीस जारी करू शकतो.चेक बाऊन्सची नोटीस जारी केल्यानंतर,धनादेश देणाऱ्याने बँकेत रक्कम भरण्यासाठी अशी नोटीस मिळाल्यापासून १५ दिवसांचा कालावधी देणे आवश्यक आहे.१५ दिवसांची मुदत संपल्यानंतरही जर त्याने धनादेशाच्या रकमेची परतफेड केली नाही,तर १५ दिवसांची मुदत संपल्यापासून ३० दिवसांच्या आत देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.त्यातून फौजदारी गुन्हा दाखल होऊन आरोपीस न्यायालय शिक्षा करू शकते अशीच घटना कोपरगाव येथील ज्योती सहकारी पतसंस्थेच्या जमीनदाराबाबत घडली आहे.
यातील आरोपी जमीनदार सुरेश नरोडे याचे विरुद्ध कोपरगाव येथील न्यायालयात एस.सी.सी.नं.१९८/२०१७ दाखल केला होता.त्यामध्ये चौकशीअंती आरोपी सुरेश बाबुराव नरोडे यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.परिणामी कोपरगांव येथील न्यायाधीश जी.डी.अग्रवाल यांनी आरोपीस १२ महिन्याचे साधा कारावासाची शिक्षा ठोठावली तसेच फिर्यादी ज्योती पतसंस्थेस रु.१५ लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश केला पारित केला आहे.तसेच नुकसान भरपाईची रक्कम निकाल तारखेपासून ३० दिवसात पतसंस्थेस न दिल्यास आरोपीस पुन्हा ६ महिन्याचे साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.याबाबत पतसंस्थेने समाधान व्यक्त केले आहे.
दरम्यान याकामी अॅड.एस.डी.काटकर यांनी कामकाज पाहिले आहे.