जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

…’त्या’ आरोपीस चार दिवसांची पोलीस कोठडी !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

    कोळपेवाडी येथे फिर्यादी परवाना धारक वाळू वाहतूक चालक ऋषिकेश राजेंद्र मेहेरखांब यांचेकडून ०५ हजार रुपयांचा मासिक हप्ता वसूल करताना व चाकू तोंडावर छातीवर वार करून गंभीर दुखापत केल्या प्रकरणी वार्ताहर रमेश भाऊराव भोंगळ याला कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक करून कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायालयात हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्या.स्मिता बन्सोड यांनी त्यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली आहे.

  

यातील आरोपी रमेश भोंगळ यास कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली होती.त्याला कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायालयात न्या.स्मिता बन्सोड यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी रमेश भोंगळ यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.त्याला उद्या पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

 

    सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातून गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू आहे.यात सरकारच्या सर्वच यंत्रणा सामील आहे.या संबंधी आमच्या प्रतिनिधीने सरकारी अधिकारी आणि महसुली कर्मचारी,लाचलूचपत विभाग,स्थानिक गून्हेशाखा यांचाही समावेश असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.त्यातच अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना नडणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर लाचलुचपत विभागाला हाताशी धरून अवैध वाळू चोर त्यांना लाच घेताना आटकवत असल्याचे वारंवार दिसत आहे.यात महसूल आणि पोलिस यांच्यात मेळ नसल्याचा गैरफायदा घेऊन अवैध वाळू चोरी करणारे भलतेच चेकाळले आहे.त्यांना राजकीय अभय मिळत असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे.वाळूचे हप्ते थेट वरिष्ठ पातळीवर पोहचत असल्याने खाली सर्वच बेताल वागत असून अलीकडील काळात आता पत्रकार आणि वार्ताहर हप्ते गोळा करू लागले आहे.दरम्यान ही मंडळी थेट अधिकाऱ्यांकडे वाळूचोरीची हप्ते मागत असल्याचे दाहक वास्तव उघड झाले आहे.ही मागणी थोडी थिडकी नसून महिन्याला लाख रुपयांची मागणी असल्याचे उघड होत आहे.त्यातून हप्ता दिला नाही तर वृतपत्रात बातम्या देऊ अशी धमकी दिली जात आहे.असाच प्रकार चार दिवसापूर्वी म्हणजेच दिनांक १७ मार्च २०२५ रोजी कोळपेवाडी येथे उघड झाला आहे.

कोपरगाव येथील न्यायालय.

  यातील डंपर गाडी (क्रं.एम.एच.१४ डी.एम.४०९०) अडवून,” वाळू वाहतूक करायची असेल तर आम्हाला दरमहा ०५ हजार रुपये द्यावे लागतील नाही तर हातपाय तोडून टाकू अशी धमकी देऊन पैशाची मागणी केली असल्याचा आरोप केला आहे व उपरण्यात दगड बांधून दगडाने व चाकूने तोंडावर व उजव्या हातावर मारहाण करून त्यांना गंभीर दुखापत केली असल्याचा आरोप आहे.त्यात ऋषिकेश महेरखांब  हे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.याबाबत दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

   यातील ऋषिकेश मेहेरखांब यानी कोपरगाव तालुका पोलिसांत गुन्हा क्रमांक-८५/२०२५ भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ३०८(४),११८(२),१२६,(२),३५१(२),३५२,३,(५) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.यातील आरोपी रमेश भोंगळ यास कोपरगाव तालुका पोलिसांनी अटक केली होती.त्याला कोपरगाव येथील वरिष्ठ स्तर न्यायालयात न्या.स्मिता बन्सोड यांचे समोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी रमेश भोंगळ यास चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.त्याला उद्या पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाणार असून पुढील कार्यवाही संपन्न होणार असल्याची माहिती पोलिस अधिकारी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close