जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

धनादेश वटला नाही,आरोपीस ६ महिन्याची शिक्षा!

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील भुसार मालाचे व्यापारी सुधाकर जामदार यांना पुणे येथील व्यापारी सुरेश प्रसाद यांनी आपल्या खात्यावर पुरेशी रक्कम नसतानाही बँक धनादेश देऊन फसवणूक केल्या प्रकरणी नुकत्याच संपन्न झालेल्या सुनावणीत कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी महेश ए.शिलार यांनी सदर आरोपीस ०६ महिन्याची शिक्षा व १२ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिल्याने खोटे धनादेश देणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

   

सदर प्रकरणी फिर्यादी इसम सुधाकर जामदार यांची बाजू ऍड.अशोक टूपके यांनी मांडली व जोरदार युक्तिवाद केला होता.तर त्यांना ऍड.माधुरी काटे,वर्षा उन्हाळे,साक्षी अकोलकर,ऍड.सागर घुमे यांनी सहाय्य केले होते.दरम्यान या न्यायालयीन आदेशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

   सदरचे सविस्तर वृत्त असे की,”एखाद्याला व्यवहारापोटी दिलेल्या रक्कमेचा धनादेश बँकेत खात्यावर जमा केला असता तो न वटता परत आला त्यास चेक बाऊन्स होणे म्हटले जाते,चेक बाऊन्स झाला तर अशा स्थितीत निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट अॅक्ट १८८१ नुसार बँकेच्या खात्यात पुरेशी रक्कम नसताना चेक दिल्यास तो कलम १३८नुसार गुन्हा समजला जातो.त्यानंतर संबंधिताला दोन वर्षे शिक्षा अथवा धनादेशामध्ये नमूद रकमेच्या दुप्पट रकमेचा दंड ठोठावण्यात येतो.धनादेश न वटता परत येणे गुन्हा आहे.मात्र,बँकेमध्ये तीन महिने अथवा तीन महिन्यांपर्यंत चेक जमा केला जाऊ शकतो.चेक प्राप्त करणारा बँकेत तो जमा करतो.चेक बाउन्स झाल्याचे संबंधिताला कळाल्यानंतर चेक देणाऱ्या व्यक्तीला नोटीस पाठवली जाते.त्यामध्ये चेक रद्द झाला असून,तितकी रक्कम बँकेत त्वरित भरण्याविषयी बजावले जाते.नोटीस प्रमाणे मुदतीत रक्कम बँकेत न भरणा केलेस रितसर कलम १३८ कलमानुसार खटला चालविला जातो व पुराव्याच्या आधारावर शिक्षा सुनावली जाती.अशीच घटना नुकतीच कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी महेश शीलार यांचे न्यायालयात दाखल झाला होता.

    यातील फिर्यादी सुधाकर म्हाळुजी जामदार हे इसम धोत्रे येथील भुसार मालाचे व्यापारी असून त्यांचा मका,सोयाबीन खरेदीचा व्यवसाय आहे.त्यांनी आपला माल पुणे येथील व्यापारी तथा पुणे येथील,’गोल्डन बर्डस’ या नावाने कुक्कुट पालन करणारा इसम सुरेश प्रसाद याने १० लाख ३६ हजार ८७८ रुपयांचा माल खरेदी केला होता.त्या बदल्यात सुरेश प्रसाद याने सुधाकर जामदार यांना बँक खात्यावर पुरेशी रक्कम असल्याचा विश्वास देऊन धनादेश दिला होता.जामदार यांनी सदरचा धनादेश ताब्यात घेऊन तो आपल्या बँक खात्यावर भरला असता तो वतला नव्हता.परिणामी जामदार यांनी सदर प्रकरणी सुरेश प्रसाद यास कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात खेचले होते.त्याची सुनावणी होऊन त्याबाबत दोन्ही बाजू न्यायालयाने तपासल्या आहे व त्याबाबत आपला निकाल नुकताच दिला असून यात पुणे येथील आरोपी सुरेश प्रसाद हा दोषी आढळून आला आहे.त्यात अतिरिक्त मुख्य न्यायदंडािकारी महेश शिलार यांनी यातील आरोपी प्रसाद यास ०६ महिन्याची शिक्षा व १२ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिल्याने खोटे धनादेश देणाऱ्यांत खळबळ उडाली आहे.

   सदर प्रकरणी फिर्यादी इसम सुधाकर जामदार यांची बाजू ऍड.अशोक टूपके यांनी मांडली व जोरदार युक्तिवाद केला होता.तर त्यांना ऍड.माधुरी काटे,वर्षा उन्हाळे,साक्षी अकोलकर,ऍड.सागर घुमे यांनी सहाय्य केले होते.दरम्यान या न्यायालयीन आदेशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close