न्यायिक वृत्त
गोळीबार प्रकरण,चार आरोपींची पोलीस कोठडी तर अन्य न्यायालयीन कोठडीत
न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव शहरात दिनांक 19 सप्टेंबर रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी शहर पोलिसांनी दोन्ही गटाच्या तब्बल नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यातील पहिसल्या गुन्ह्यातील अटक आरोपी दादा मोरे,राहता,रवी बनसोडे,अमर भोसले,लोणी,बाळू पगारे,शिंगवे,रवी बनसोडे रा.श्रीरामपूर आदीना आज कोपरगाव येथील सहदिवाणी न्यायधिश वरिष्ठ स्तर न्या.भगवान पंडित यांनी न्यायालयीन कोठडी तर दुसऱ्या गटातील आरोपी नाजिम शेख,एजाज मणियार,सांगर मंजुळ,अजहर शेख आदींना गुन्ह्यातील हत्यार कुठून उपलब्ध केले याचा तपास होणे बाकी असल्याने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.गुन्ह्यातील दोन गाड्या आणि दोन्ही गटातील दोन गावठी कट्टे पोलिसांनी जप्त केले आहे.
कोपरगाव शहरात अलीकडील काळात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.त्यामुळे सामान्य माणसाला जीव मुठीत धरून जगण्याची नामुष्की ओढवली असल्याचे दिसून येत आहे.त्यावरून वर्तमानात सोमवार दि.09 सप्टेंबर व त्या पाठोपाठ 19 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिरासमोर एकमेकांविरुद्ध थेट गोळीबार करण्याची धक्कादायक घटना घडली होती.त्यातील एक आरोपी तनवीर रंगरेज हा गंभीर जखमी झाला असून त्याच्या पोटात आणि छातीत दोन गोळ्या शरीरात आढळलेल्या असून त्याच्यावर मुंबई येतील जे.जे.हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्याच्या आली असून त्याच्या शरीरातून दोन गोळ्या काढण्यात आल्या आहेत आता तो धोक्याच्या बाहेर असल्याची विश्वसनीय माहिती आहे.त्याचा जबाब महत्त्वपूर्ण ठरणार असून तो अद्याप बाकी आहे.त्यात अनेक खुलासे व अन्य आरोपींची नावे उघड होणार असल्याचे बोलले जात आहे तर श्रीरामपूर येथील टोळीतील एक आरोपी शाहरुख शेख अद्याप फरार आहे.त्याचा कोपरगाव शहर पोलिस शोध घेत आहेत.या टोळीवर सुमारे दहा ते पंधरा गुन्हे दाखल असून हे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे त्यांना न्यायालयात आणताना शहर पोलिस दक्षता घेताना आढळून आले आहे.
दरम्यान आ.आशुतोष काळे आणि संजीवनी कारखांन्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्यात आरोपप्रत्यारोपांचा राजकीय शिमगा सुरू आहे.अशातच वरील टोळी युद्धातील आरोपींच्या कोठडीची मुदत आज संपल्याने शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा चौकशी अधिकारी आयुष शेळके यांनी आज सदर आरोपींना आज कोपरगाव येथील सहदिवाणी न्यायधिश वरिष्ठ स्तर न्या.भगवान पंडित यांचे समोर त्यांना हजर केले असता सरकारी वकील ऍड.प्रदीप रणधीर यांनी अद्याप नाजिम शेख,एजाज मणियार,सांगर मंजुळ,अजहर शेख आदीं आरोपींनी हत्यारे कुठून आणली याचा तपास होणे बाकी असल्याची बाब न्यायालयाचे निदर्शनास आणली होती.तर सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुष शेळके यांनी न्यायालयाने विचारणा केली असता त्यांनी त्यास दुजोरा दिला असता न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान दुसऱ्या टोळीतील आरोपी दादा मोरे,राहता,रवी बनसोडे,अमर भोसले,लोणी,बाळू पगारे,शिंगवे,रवी बनसोडे रा.श्रीरामपूर आदी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन आणि एक कट्टा जप्त केला असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता व पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचा तपासला आवश्यक वस्तू जप्त झाल्या असल्याचे सांगितल्याने त्यांना पोलिस कोठडीची गरज नाही असा युक्तीवाद ऍड.प्रदीप रणधीर यांनी केला होता तो न्यायालयाने ग्राह्य धरून आरोपींना न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.आरोपींच्या वतीनेश्रीरामपूर येथील ऍड.शेख यांनी काम पाहिले आहे.