न्यायिक वृत्त
सरकारी कामात अडथळा,आरोपी निर्दोष
न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील महावितरण कंपनीतील कर्मचारी राजेंद्र कोळी हे येवलारोड नाजिक असलेल्या साई सृष्टी येथील हॉटेल मध्ये सात वर्षापूर्वी मीटर तपासणीसाठी आले असता त्यांना आरोपी सोमनाथ तुळशीराम आढाव यांनी धक्काबुक्की करून मारहाण केली व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होऊन आरोपी आढाव यांची निर्दोष सुटका केली असल्याचा निकाल दिला असल्याची माहिती ऍड.योगेश खालकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सरकारी कर्मचारी किंवा अधिकाऱ्याला त्याचे काम करण्यापासून रोखणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी 332 हे कलम आहे.तर सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्यावर कारवाईसाठी 353 हे कलम आहे.या दोन्ही कलमांनुसार पूर्वी तीन वर्षांची शिक्षा होती,आता नव्या बदलानुसार पाच वर्षे शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना या कलमान्वये संरक्षण लाभले आहे.मात्र याचा बऱ्याच वेळा दुरुपयोग होताना दिसत असून यात अनेकांना हकनाक गोवले जात आहे.त्यातून न्यायालयात खटले दखल होतात व त्यातून अनेकांना न्यायालयाच्या चकरा माराव्या लागतात अशीच घटना सात वर्षापूर्वी दी.13 सप्टेंबर 2017 रोजी येवलारोड नजिक असलेल्या हॉटेल साई सृष्टी येथे महावितरण कंपनीचे कर्मचारी राजेंद्र कोळी हे गेले असता त्याठिकाणी त्यांना आरोपी सोमनाथ तुळशीराम आढाव यांनी धक्काबुक्की करून मारहाण केली असल्याचा आरोप केला होता व शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यासाठी गुन्हा क्रमांक 114/2017 दाखल होऊन त्यासाठी भा.द.वी.कलम 353,332,186,504 कलमे लावण्यात आली होती.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून आरोपी विरुध्द कोपगाव येथील येथील जिल्हा व सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता.त्याची सुनावणी नुकतीच संपन्न झाली होती.त्यात आरोपीच्या वतीने ऍड.योगेश खालकर यांनी जोरदार बाजू मांडली होती.व त्यासाठी उच्च व सर्वोच्च न्यायालयातील विविध दाखले दिले होते.दोन्ही पक्षाच्या वतीने दावे प्रती दावे ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून त्याबाबत आपला निकाल नुकताच जाहीर केला आहे. त्यात आरोपी सोमनाथ आढाव यांची निर्दोष सुटका केली असल्याचा निकाल दिला असल्याची माहिती ऍड.योगेश खालकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यांना ऍड.रमेश दुशिंग,ऍड.राहुल वाकचौरे यांनी सहाय्य केले आहे.यातील आरोपीने याबाबत समाधान व्यक्त केले आहे.