जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

 कट मारून गाडीचे नुकसान,तीन आरोपीस तीन वर्षाची शिक्षा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
  

   कोपरगाव तालुक्यातील करंजी शिवारात रहिवासी निरंजन वाल्मिक भिंगारे (वय-२५) यांच्या मारुती अल्टो गाडीस रिक्षाचा कट मारून नुकसान करून वरून नुकसान भरपाईस शिरजोरी करून फिर्यादिस लोखंडी गजाने मारहाण करून जखमी करणारा आरोपी अनिल दगडू अहिरे व त्याचे अन्य दोन सख्खे भाऊ यांना कोपरगाव येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी एम.ए.शेलार यांनी ०३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व एकूण ०५ हजाराचा दंड ठोठावला असल्याने शिरजोरी करणाऱ्या प्रवृत्तीस जरब बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया सामान्य नागरिकांत उमटली आहे.या प्रकरणी फिर्यादीचे वतीने ऍड.प्रदीपकुमार रणधीर यांनी काम पाहिले होते.

  

   फिर्यादी व साक्षीदार यांचे जबाब,पंचनामे शाबीत करणारे पंच व त्यांच्या साक्षि वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षि महत्वाच्या ठरल्या होत्या.त्या संबधीत न्यायालयाने गृहीत धरुन आरोपी अनिल अहिरे त्याचे अन्य दोन भाऊ सुनील अहिरे,अजय अहिरे यांचेसह अन्य तीन अनोळखी आरोपींना भा.द.वि.कलम ३२६ नुसार ३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

  सदरचे सविस्तर वृत असे की,कोपरगाव फिर्यादी वाल्मिक भिंगारे हे करंजी येथील रहिवासी असून त्यांच्या मालकीची मारुती अल्टो ही चार चाकी गाडी आहे.ते दि.३१ मे २०१७ रोजी आपल्या ताब्यातील गाडीने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीस करंजी हद्दीत आरोपी अनिल दगडू अहिरे याने आपल्या ताब्यातील रिक्षाने कट मारला होता.त्यात फिर्यादीचे ताब्यातील मारुती अल्टो हिचे नुकसान झाले होते.त्याबाबत फिर्यादी भिंगारे यांनी आरोपीस अनिल अहिरे यास जाब विचारला होता.याचा राग येऊन आरोपीने फिर्यादिस दि०१ जून २०१७  रोजी येवला नाका येथील राजलक्ष्मी इरिगेशन या दुकानासमोर बोलावून,”तुला नुकसान भरपाई देतो” असे खोटे सांगून आपले भाऊ सुनील दगडू अहिरे व अजय दगडू अहिरे यांचेसह अन्य तीन अनोळखी आरोपींना बोलावून येवला नाका या ठिकाणी  फिर्यादी निरंजन भिंगारे यांना त्यांचे आई,वडील,व अन्य साक्षीदार यांचे समोर लोखंडी गजाने डाव्या पायावर मारहाण केली होती.त्यात त्यांच्या डाव्या पायास गंभीर दुखापत झाली होती व पाय मोडला होता.या घटनेनंतर आरोपी तेथून फरार झाले होते.

  दरम्यान फिर्यादी निरंजन भिंगारे यांनी या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी अनिलअहिरे व त्यांच्या दोन भावावर व दांडगाई करणाऱ्या अन्य तीन अनोळखी इसमावर गुन्हा क्र.६०/२०१७ भा.द.वि.कलम ३२६,१४१,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी तपास करून प्रमुख तीन आरोपीसह सहा आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणी पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एम.पी.सातपुते यांनी तपास केला होता.

  या प्रकरणी कोपरगाव येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.ए.शिलार यांचे न्यायालयासमोर सदर खटला सुरू होता.या प्रकरणी सरकारी अभियोक्ता प्रदीपकुमार रणधीर यांनी फिर्यादीचे वतीने जोरदार युक्तिवाद केला होता.त्यात फिर्यादी व साक्षीदार यांचे जबाब,पंचनामे शाबीत करणारे पंच व त्यांच्या साक्षि वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षि महत्वाच्या ठरल्या होत्या.त्या संबधीत न्यायालयाने गृहीत धरुन आरोपी अनिल अहिरे त्याचे अन्य दोन भाऊ सुनील अहिरे,अजय अहिरे यांचेसह अन्य तीन अनोळखी आरोपींना भा.द.वि.कलम ३२६ नुसार ३ वर्ष सश्रम कारावास व रुपये ०२ हजार दंड,तसेच भा.द.वि.कलम १४७ व१४९ नुसार ०२ वर्ष शिक्षा व १ हजरांचा दंड तसेच कलम १४८,१४९ प्रमाणे ३ वर्षे शिक्षा व रुपये ०१ हजार रुपये दंड,भा.द.वि.कलम ५०४ व १४९ प्रमाणे ०२ वर्ष शिक्षा व ०१ हजार रुपये दंड अशी एकूण ०३ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षाव एकूण०५ हजारांच्या दंडाशी शिक्षा ठोठावली आहे. 

   या प्रकरणी फिर्यादीचे वतीने सरकारी अभियोक्ता प्रदीपकुमार रणधीर यांनी काम पाहिले आहे.न्यायालयाच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.व असामाजिक तत्वांना चाप बसण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांत उमटली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close