जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

..’त्या’ आरोपीस पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी तौसिफ कलीम बागवान याचे विरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला शहर पोलिसांनी कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती त्याची मुदत आज संपल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

  

आरोपी बागवान हा जामखेड येथे लपून बसला होता.त्यास पोलिसानी जेरबंद केले असून या कामी त्यास विशेष तथा अतिरिक्त व सत्र जिल्हा न्यायाधीश यांचे समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण त्यास दि.१९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सूनावली होती.मात्र त्याची आज मुदत संपल्याने पुन्हा एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

  सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रहिवासी असलेल्या अल्पवयीन मुलीस चार मुलांचा बाप असलेला मावळा चौफुली,गांधीनगर कोपरगाव येथील इसम तौसिफ कलीम बागवान याने ऑगष्ट २०२३ पासून गोड बोलून अल्पवयीन मुलीचे मोबाईलवर वारंवार फोन करून तिला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने आणलेल्या गाडीत बसवून नेऊन जेऊर पाटोदा हद्दीत असलेल्या निर्जनस्थळी नेऊन तिला आपल्या वासनेची शिकार बनवली असून त्याने तिच्या गोड बोलण्याचा गैरफायदा घेतला असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असून सदर मुलीस त्रास होऊ लागल्याने त्या बाबत तिने आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबद आपल्या आईस माहिती होती.गत सात साडेसात महिन्या पासून होत असलेल्या त्रासाने वैतागून तिने हि बाब आपल्या आईच्या निदर्शनास आणून दिल्याने सदर घटना उघड झाली आहे.
  या प्रकरणी आईसह तिच्या नातेवाईकांनी व शिवसेनेसह काही सामाजिक कार्यकर्त्यानी पुढाकार घेऊन आरोपी विरुद्ध दि.१५ एप्रिल २०२४ रोजी रात्री उशिरा गुन्हा क्रं.१९५/२०२४ दि.१६ एप्रिल ऐवजी दाखल केला होता.व घटनेला वाचा फुटल्यावर तो फरार झाला होता.
   या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.व त्याच्या तपासार्थ वेगवेगळ्या ठिकाणी तीन पथके रवाना केली होती.त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारे त्यांनी पोलिसांनी त्याचा तपास केला असता तो नगर जिल्ह्यातील जामखेड येथे लपून बसला होता.त्यास पोलिसानी जेरबंद केले असून या कामी त्यास विशेष तथा अतिरिक्त व सत्र जिल्हा न्यायाधीश यांचे समोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकूण त्यास दि.१९ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सूनावली होती.मात्र त्याची आज मुदत संपल्याने आज तपासी पोलीस अधिकाऱ्यांनी त्यास पुन्हा आज हजर केले असता त्यास दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण आणखी एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

   दरम्यान या आरोपीस अटक केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे,पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पो.हे.कॉ.बाबासाहेब कोरेकर,पो.कॉ.गणेश कानडे,सुंबे,राम खारतोडे,भांगरे,चालक जाधव आदींनी चोख कामगिरी बजावली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close