न्यायिक वृत्त
…’त्या’ खुनातील आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
फिर्यादी प्रेयसीवर लैंगिक अत्याचार करून प्रियकराला ठार मारल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात घडली असून या घटनेतील आरोपीस आज कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सूनावली असल्याची माहिती चौकशी अधिकाऱ्यांनी दिली आहे.दरम्यान या घटनेतील अद्याप आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की,”मयत नागेश ऊर्फ नाग्या शिवराम चव्हाण (वय-२३ वर्षे) रा.जेऊर कुंभारी,कोपरगाव याचे व फिर्यादी मुलीचे प्रेम सबंध होते.मयत हा फिर्यादीस मुलीला त्याच्या दुचाकीवरून कोळपेवाडी येथील त्याचा मित्र आरोपी अर्जुन ऊर्फ भुर्ज्या गोपाल पिंपळे व आरोपी चांदणी पिंपळे यांचे घरी घेवुन गेला होता.रात्रीच्या वेळी मयत नागेश चव्हाण व आरोपी अर्जुन पिंपळे हे एका खोलीत तसेच फिर्यादि मुलगी व आरोपी चांदणी पिंपळे हे दुसऱ्या एका खोलीत झोपले असताना,मयत नागेश चव्हाण हा पहाटे ०४ ते ०५ वाजेच्या दरम्यान फिर्यादी जवळ गेला व तिच्या सोबत बळजबरी करू लागला होता.
दरम्यान त्याचा आवाज ऐकुण आरोपी चांदणी पिंपळे ही देखील फिर्यादीचे जवळ गेली.तेव्हा मयत नागेश चव्हाण व आरोपी अर्जुन पिंपळे यांच्यात भांडणे सुरु झाली होती.घरात भांडण चालु असल्याने आरोपी चांदणी पिंपळे हिने आरोपी भुर्ज्याचा मित्र भाऊ पूर्ण नाव माहित नाही यास बोलावुन घेतले होते.त्यानंतर ०५ वाजेच्या दरम्यान आरोपी भुर्ज्याचा मित्र भाऊ पूर्ण नाव माहित नाही याने नागेश चव्हाण यास खाली पाडुन त्याचे दोन्ही हात दाबुन ठेवले.त्यानंतर आरोपी अर्जुन पिंपळे याने नागेश चव्हाणला जिवे मारण्याच्या हेतुने दोरीने गळा आवळुन त्याचा खुन केला तसेच आरोपी अर्जुन पिंपळे याने फिर्यादी मुलीला चाकुचा धाक दाखवुन,तिच्या सोबत बळजबरीने लैंगिक अत्याचार करून कोंडून ठेवले व आरोपी चांदणी पिंपळे हीने मयत नागेश चव्हाण याला बांधण्यासाठी साडी आणली व तीनही आरोपीनी संगणमताने नागेश चव्हाण याचे प्रेत गोणीत भरून,साडीने बांधुन प्रेत कोठेतरी अज्ञात ठिकाणी पाण्यात टाकुन त्या प्रेताची विल्हेवाट लावुन त्याचा पुरावा नाहीसा केल्याची घटना उघड झाली आहे.
सदर घटना कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी शिवारात घडली असून यामुळे कोपरगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.यातील फिर्यादी मुलगी अल्पवयीन असल्याने या प्रकरणात पोक्सो कायदा लागू करण्यात आला आहे.
दरम्यान वरील तीनही आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गु.रजि.नं.व कलम ९४/२०२४ भा.द.वि.कलम ३०२,३७६(२), (आय),३४२,२०१,५०४,५०६,३४ सह बालकाचे लैंगींक अत्याचारा पासुन संरक्षण कायदा २०१२चे कलम ४,६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान आरोपी अर्जुन पिंपळे याला पोलिसांनी अटक केली होती.व त्यास जिल्हा व सत्र न्याल्यालायसमोर हजर केले असता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद एकूण सत्र न्यायालयाचे न्या.देसाई यांनी आरोपीस सात दिवसांची पोलीस कोठडी सूनावली असल्याची माहिती पोलिसानी दिली आहे.दरम्यान या प्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी हे करत आहेत.