जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

पश्चिमेचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी जनहित याचिका दाखल

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   गोदावरी खोरे हे पाण्याच्या बाबतीत तुटीचे खोरे आहे.त्यातच पाण्यावरून नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा असा संघर्ष गेल्या काही दशकापासून धुमसत आहे.पाण्याचा उपलब्धतेच्या मर्यादा लक्षात घेता पश्चिम वाहिनी नद्यांचे कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याशिवाय पर्याय नाही.मात्र सरकार निवडणुका पाहून घोषणा करण्यापलीकडे काहीही कृती करत नसल्याचे वारंवार उघड होत आहे.त्यामुळे हे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार नानासाहेब जयराम जवरे व विक्रांत रुपेंद्र काले यांनी नुकतीच शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर खंडपिठात आज एक जनहित याचिका (क्रं.१२१७/२०२४) दाखल केली आहे.त्यामुळे नगर-नाशिक व मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

  

“राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालानुसार कोकणातील नार-पार,दमणगंगा,वैतरणा,उल्हास नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात प्रवाही वळण योजनांद्वारे; तसेच उपसा नदीजोड,वळण योजनांद्वारे एकूण ८९.९२ टी.एम.सी.पाणी वळविण्याबाबत आखणी करून त्याबाबत शिफारस केली आहे.मात्र निवडणुका पाहून केवळ घोषणा करण्यापलीकडे काही होताना दिसत नाही त्यामुळे शेतकरी उध्वस्त झाला असून या भागाचे औद्यीगिकरण व शेतकऱ्यांचा कृषिविकास पूर्ण क्षमतेने होऊ शकलेला नाही म्हणून हि जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे”-नानासाहेब जवरे,सामाजिक कार्यकर्ते,कोपरगाव.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”उत्तर कोकणातील नार-पार,अंबिका औरंगा,दमणगंगा,वैतरणा व उल्हास नदी उपखोऱ्यात ३१७ टीएमसी अतिरिक्त पाणी शिल्लक आहे.पश्चिम वाहिनी खोऱ्यातील (कोकण) अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी प्राथमिक अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने २००१ व २०१९ रोजी समिती स्थापन केली होती.या समितीच्या अहवालानुसार कोकणातील नार-पार,दमणगंगा,वैतरणा,उल्हास नदी खोऱ्यातून गोदावरी खोऱ्यात प्रवाही वळण योजनांद्वारे; तसेच उपसा नदीजोड,वळण योजनांद्वारे एकूण ८९.९२ टी.एम.सी.पाणी वळविण्याबाबत आखणी करून त्याबाबत शिफारस केली आहे.त्यानुसार जवळपास ७.४ टी.एम.सी.पाणी प्रवाही वळण योजनांद्वारे; तर १५.५ टी.एम.सी.पाणी प्रमुख उपसा वळण योजनांद्वारे असे एकूण मिळून २२.९ टी.एम.सी. पाणी वळविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.

  

“पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठी पश्चिम घाटमाथ्यावरील सर्व अपूर्ण सिंचन योजना पूर्ण करणार असल्याच्या घोषणा या भागातील शेतकऱ्यांना नवीन नाही.मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याबाबत निळवंडे प्रकल्पासारखे कोणीही नेता अथवा प्रशासकीय अधिकारी स्पष्ट बोलत व कालबद्ध कार्यक्रम जाहीर करत नाही.त्यामुळं यावर एक घाव दोन तुकडे करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे आणि विक्रांत काले यांनी निर्णय घेतला आहे हि समाधानाची बाब आहे”-अड्.अजित काळे,उपाध्यक्ष,प्रदेश शेतकरी संघटना.

यासाठी प्रवासी वळण योजनेद्वारे एकूण ३० योजना प्रस्तावित असून,यापैकी काही १४ योजना पूर्ण केल्या असल्याच्या घोषणा निवडणुका पाहून केल्या जात आहेत.त्याद्वारे १.३५ टीएमसी पाणी वळविले जाईल.११ भविष्यकालीन योजनांद्वारे ४.९८ टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात वळविणे प्रस्तावित असल्याच्या घोषणा ऐकून शेतकऱ्यांना आता विट आला आहे.मुख्य म्हणजे प्रमुख उपसा वळण योजनेद्वारे जवळपास १५.५५ टी.एम.सी.पाणी वळविण्याचे प्रस्तावित आहे.यात प्रवरा खोऱ्यातील घाटघर जवळील हिवरा नाला तसेच साम्रद गावाजवळील साम्रद नाला येथे वळण बंधारे बांधून पश्चिमेकडे जाणारे पाणी पूर्वकडे वळविण्याची योजना आहे.या बंधाऱ्याद्वारे एकूण १२८७ द. ल.घ.फूट अतिरिक्त पाणी वळविणे शक्य होणार असून त्याचा निळवंडे प्रकल्पासाठी फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

तर कोकणातून समुद्रात वाहून जाणारे १६७ टी.एम.सी.पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येणार आहे.तसेच वैनगंगा-नळगंगा योजनेअंतर्गत ४८० किमीचा बोगदा तयार करून वैनगंगा नदीचे पाणी थेट पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात आणले जाणार आहे.यासोबतच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील दुष्काळ हटवण्यासाठी त्या भागातली सर्व अपूर्ण सिंचन योजना पूर्णत्वास घेऊन जाण्याचा प्रयत्न असणार असल्याच्या घोषणा या भागातील शेतकऱ्यांना नवीन नाही.मात्र प्रत्यक्षात हा प्रकल्प कधी पूर्ण होणार याबाबत निळवंडे प्रकल्पाबाबत कोणीही नेता अथवा प्रशासकीय अधिकारी स्पष्ट बोलत नाही.त्यामुळं यावर एक घाव दोन तुकडे करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब जवरे आणि विक्रांत काले यांनी निर्णय घेतला होता.व त्या दृष्टीने कागदपत्र जमवणे अनेक वर्षांपासून सुरु ठेवले होते.त्याबाबत नुकतीच तयारी पूर्ण झाली होती.व त्यासाठी शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे यांच्याशी विचार विनिमय व एक बैठक छ.संभाजीनगर येथे संपन्न होऊन त्यावर नुकतीच निळवंडे (तथा ऊर्ध्व प्रकल्प-२) सारखी जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्या नुसार आज दुपारी मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.संभाजींनगर येथील कोर्ट क्रं.एकचे न्या.रवींद्र घुगे व न्या.वाय.जी.खोब्रागडे यांचे समोर हि जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.त्याची सुनावणी आगामी गुरुवार दि.१८ जानेवारी २०२४ रोजी संपन्न होणार असल्याची माहिती अड्.अजित काळे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

   दरम्यान या याचिकेबाबत अ.नगर-नाशिक,मराठवाडा,निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते,शेतकरी आदींनी समाधान व्यक्त केले आहे.व शेतकऱ्यांचा दुष्काळ हटविण्यासाठी हा एकमेव पर्याय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.



Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close