जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

ऍट्रॉसिटीतील आरोपींबाबद जिल्हा न्यायालयाने घेतला…हा निर्णय !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

   राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री गावात दि.०६ डिसेंबर रोजी मागील भांडणांच्या कारणावरून दोन गटात हाणामारी,दंगल ऍट्रॉसिटीच्या घटनेतील पाच आरोपीची पोलीस कोठडी आज संपल्याने त्यांना आज कोपरगाव येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यांचा नियमित जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला असला तरी उर्वरित अटक पूर्व आरोपींचा जमीन अर्ज न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती जिल्हा न्यायालयातील सूत्रांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

दरम्यान अटक पाच आरोपींची कोठडी आज संपल्याने शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी आज त्यांना कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.एस.बी.देसाई यांचेसमोर हजर केले असता त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा असा युक्तिवाद आरोपींचे वकील अड्.जोशी यांनी केला होता.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पाच जणांचा जामीन मंजूर केला असून उर्वरित फरार आरोपींचा अटकपूर्व जामीन मात्र फेटाळला आहे.


 
     याबाबत समजलेली माहिती अशी की,”सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी राहता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अ.नगर-मनमाड रस्त्याच्या कडेला असलेल्या अस्तगाव शिवारातील एका हॉटेलमध्ये पिंपरी निर्मळ गावातील तरुणांच्या दोन गटात वाद झाले होते.याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.७३६/२०२३  विविध कलमान्वये दि.०७ डिसेंबर रोजी ऍट्रॉसिटीचा गुन्हा विविध कलमान्वये दाखल करण्यात आला होता.या घटनेनंतर गाव पातळीवर गाव बंद ठेवत मोठा राडा झाला होता.मात्र या दोन गटांमध्ये पोलिसांच्या सहकार्याने वादावर पडदा टाकण्यात आला होता.परंतु बुधवार दिनांक ६ डिसेंबर रोजी रात्री या मागील भांडणाच्या कारणावरून गावातील एका गटाच्या जमावाने दोन घरांना लक्ष करीत संतप्त झालेल्या १०० ते १२५ लोकांच्या जमावाने घरांची तोडफोड,जाळपोळ करून घरासमोर लावलेल्या वाहनांचे नुकसान करताना काहींना गंभीर मारहाण केली होती.या घटनेची माहिती लोणी पोलिसांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हल्ला झालेल्या कुटुंबियांच्या लोकांना संरक्षण दिले असता संतप्त झालेल्या जमावातील काही जणांनी या ठिकाणी बंदोबस्तासाठी असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांपैकी एका पोलीस कर्मचाऱ्यांचे कपडे फाडून त्याचा मोबाईल हिसकवला तर दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या खाजगी वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या त्यानंतर जमाव निघून गेला असल्याची माहिती उपलब्ध झाली होती.

   दरम्यान या प्रकरणी फिर्यादी महिलेने (वय-४५) दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलीस ठाण्यात ६८ आरोपी व ४०-५० नागरिक व १० महिला अशा एकूण जवळपास १२८ जणांविरोधात अॅट्रोसीटीसह मारहाण व नुकसान केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.यातील आरोपी सोपान कारभारी निर्मळ,विकास बाळकृष्ण निर्मळ,मयूर भिमराज निर्मळ,भाऊसाहेब रावसाहेब दारुवाले,आदित्य भाऊसाहेब दारुवाले आदी पाच आरोपींना राहाता पोलिसांनी अटक केली होती.तर अन्य आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान अटक पाच आरोपींची कोठडी आज संपल्याने शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनी आज त्यांना कोपरगाव येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या.एस.बी.देसाई यांचेसमोर हजर केले असता त्यांचा जामीन अर्ज मंजूर करावा असा अर्ज करून सदर प्रकरणात ऍट्रॉसिटी कायद्याप्रमाणे खटला दाखल नाही.आरोपींचा यात सहभाग स्पष्ट होत नाही.आरोपिवरचे  आरोप हे राजकीय वादातून असून त्यास वेगळा रंग दिला जात असा युक्तीवाद  करून आरोपींचे वकील अड्.जयंत जोशी यांनी आरोपींचा जमीन मंजूर करावा असा युक्तिवाद केला होता.

दरम्यान जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींचा नियमित जामीन मंजूर केला असला तरी उर्वरित आरोपींचा अटक पूर्व जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीस उपलब्ध झाली आहे.

   दरम्यान या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अड्.अशोक वहाडणे यांनी  काम पाहिले तर आरोपींच्या वतीने अड्.जयंत जोशी यांनी काम पहिले आहे.त्यांना अड्.व्यंकटेश ख्रिस्ते,अड्.योगेश दाभाडे,अड्.शिवम मोरे,अड्.सुजय होन,अड्.सुरेंद्र जाधव,अड्.प्रशांत कोते,अड्.तन्मय घोडके आदींनी साहाय्य केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close