जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
न्यायिक वृत्त

उच्च न्यायालयाच्या स्थगिती नंतरही बांधकाम सुरु,कोपरगावातील प्रकार

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव नगर परिषद हद्दीत सर्व्हे क्रं.१९२६(क) मधील बांधकामास मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील न्यायालयाने स्थगिती दिली असताना काम सुरु असल्याची तक्रार भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांनी मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांचेकडे केली आहे.त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

दकोपरगाव नगरपरिषद हद्दीत अतिक्रमण हा ऐरणीवर असलेला विषय आहे.१० मार्च २०११ रोजी जिल्हाधिकारी यांनी सुमारे २२०० अतिक्रमणे हटविली होती.तरीही आज शहरात तितक्याच संख्येने अतिक्रमने वाढलेली दिसत आहे.धारणगाव रोड,येवला रोड,कोर्ट रोड,स्टेशन मुख्यरस्ता आदी ठिकाणी तितक्याच संख्येने अतिक्रमणे वाढलेली दिसतात.कोपरगाव नगरपरिषद प्रशासन त्याकडे काना डोळा करताना दिसत आहे.त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होताना दिसत आहे.अशीच घटना नुकतीच उघड झाली आहे.

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत अतिक्रमण हा ऐरणीवर असलेला विषय आहे.१० मार्च २०११ रोजी जिल्हाधिकारी यांनी सुमारे २२०० अतिक्रमणे हटविली होती.तरीही आज शहरात तितक्याच संख्येने अतिक्रमने वाढलेली दिसत आहे.धारणगाव रोड,येवला रोड,कोर्ट रोड,स्टेशन मुख्यरस्ता आदी ठिकाणी तितक्याच संख्येने अतिक्रमणे वाढलेली दिसतात.कोपरगाव नगरपरिषद प्रशासन त्याकडे काना डोळा करताना दिसत आहे.त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होताना दिसत आहे.त्या शिवाय गुन्हेगारीकरण मोठया प्रमाणावर वाढताना दिसत आहे.त्यावर नगरपरिषद प्रशासनाने अंकुश ठेवणे गरजेचे आहे.मात्र तसे होताना दिसत नाही.त्यासाठी पालिका कर्मचारी जबाबदार असताना दिसत आहे.अशीच घटना नुकतीच घडली आहे.

कोपरगाव शहरातील निष्ठावान भाजपचे माजी शहराध्यक्ष विनायक मुरलीधर गायकवाड यांच्या नजीक सर्व्हे क्रं.१९२६ (ड) व १९२६ (क) वर सुरु असून त्यावर अनधिकृत बांधकाम सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.सदर काम थांबविण्यासाठी वांरवार पालिका प्रशासनाकडे तक्रारी करूनही उपयोग झाला नाही.त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजी नगर येथील न्यायालयात याचिकेद्वारे (क्रं.६५११/२०२३)दाद मागितली होती.त्यासाठी न्यायालयाने त्या कामास दि.१९ जून २०२३ रोजी स्थगिती दिली आहे.मात्र त्या नंतरही त्याची गंभीर दाखल कोपरगाव पालिका प्रशासनाने घेतली नाही असा त्यांचा आरोप आहे.त्यामुळे स्थगिती नंतर हि सदर काम राजरोस चालू आहे.सदर काम त्वरित बंद करावे अशी मागणी त्यांनी मुख्याधिकारी यांचे कडे केली आहे.आता पालिका काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close