जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

सोयाबीनसह खरिप पिके पाण्यात,नुकसान भरपाई द्या-मागणी            

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

संपूर्ण कोपरगाव तालुक्यात काल झालेल्या ढगफुटीने उभ्या पिकाबरोबरच शेतीचे मोठे नुकसान झाले असून सर्व शेतकऱ्यांना सरसकट एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत राज्य शासनाने करावी अशी मागणी कुंभारीचे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत घुले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे नूकतेच केले केली आहे.

“नुकत्याच कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.ढगफुटी सदृश्य पाऊस झाला तिथे शेतकऱ्यांच्या असलेले सोयाबीन पिक पूर्ण पाण्यात तरंगत आहे.सर्व पिकांची नासाडी झाली आहेत ढगफुटी सदृश्य पावसाने हातात तोंडाशी आलेले सोयाबीन,कांदे व भुईमूग बाजरी,मका आदी सर्व पिके भुईसपाट झाले आहेत शेतामध्ये थेट गुडघे एवढे पाणी साचले आहे सोयाबीन बाजरी मका पिके सोंगणी करून पाण्यात तरंगत असून शेतकऱ्यांचेमोठे नुकसान झाले आहे”-प्रशांत घुले,सरपंच,कुंभारी ग्रामपंचायत.

त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पू ढे म्हटले आहे की,”कोपरगाव तालुका परिसरात परव रात्री ढग फुटी सदृश्य अतिवृष्टी झाली या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून उभ्या पिकाबरोबरच अनेक शेतकऱ्यांचे बागायती जमीन वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या निवळ या पिकांची नुकसान झाले असेल नाही तर पुढील काही वर्षे या जमिनी नापीक होणार आहेत काल झालेले पावसाचे नुकसानाची पंचानामे करण्यात वेळ घालवण्यापेक्षा शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये लवकरात लवकर शासनाने शेतकऱ्यांच्या खाती जमा करावे द्यावी.शेतकऱ्याची दिवाळी सुखात जाऊ द्यावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान या पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले.ढगफुटी सदृश्य पाऊस झाला तिथे शेतकऱ्यांच्या असलेले सोयाबीन पिक पूर्ण पाण्यात तरंगत आहे.सर्व पिकांची नासाडी झाली आहेत ढगफुटी सदृश्य पावसाने हातात तोंडाशी आलेले सोयाबीन,कांदे व भुईमूग बाजरी,मका आदी सर्व पिके भुईसपाट झाले आहेत शेतामध्ये थेट गुडघे एवढे पाणी साचले आहे सोयाबीन बाजरी मका पिके सोंगणी करून पाण्यात तरंगत आहेत.आपण आपल्या हयातीत प्रथमतः इतक्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पाहिली असल्याचा दावा केला आहे.रात्री एक वाजेपासून सुरू झालेला पाऊस सकाळी सहा वाजेपर्यंत चालू होता सगळीकडे जलमय परिस्थिती झाली होती.

दरम्यान आपण लोकांच्या घरी सकाळी पाहणी करत असताना लोकांच्या घरामध्ये पाणीच पाणी होतं सकाळी अनेक लोकांच्या चुलीसुद्धा पेटलेल्या नाही.दोन दिवसा वरती दिवाळी सण आलेला असताना आसमानी संकट आले आहेत.शेतकऱ्यांना त्याचा शेतीमाल विकून त्याचे लेकरा बाळांची दिवाळी साजरी करता येणार होती पण ती साजरी करता येणार नाही.राज्य शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा शेतकऱ्यांना आत्महत्या पर्याय राहणार नसल्याचे सरपंच घुले यांनी शेवटी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close