जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
नैसर्गिक आपत्ती

अतिवृष्टीची सरसकट भरपाई द्या-..या नेत्याची मागणी

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव मतदार संघात मागील आठवड्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे काढणीला आलेली पिके भुईसपाट होऊन शेतकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली असून या प्रतिकूल परिस्थतीत शेतकऱ्यांना पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करुन शासनाकडून तातडीने मदत द्या अशी  मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली आहे.

आ.काळे अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन देताना.

“कोपरगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे.यापूर्वीही आपल्या सहकार्यामुळे मतदार संघातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य नुकसान भरपाई मिळालेली आहे”-आ.आशुतोष काळे.कोपरगाव.

   कोपरगाव तालुक्यामध्ये दि.२७ सप्टेंबर पासून सलग दोन दिवस वादळ वाऱ्यासह मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला होता.परिणामी या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांची दैना उडाली होती.सोयाबीन,मका,ऊस,कापूस,फळबागा आदी पिकांचेमोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या पिकात अद्यापही मोठ्या प्रमाणावर पाणी असून अद्याप पाऊस थांबण्याची चिन्हे नाही त्यामुळे शेतकऱ्यांची त्यामुळे चिंता वाढली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेशाने तालुका प्रशासनाने हालचाली सुरू केल्या असून स्थळ पंचनामे सुरू केले आहे.मात्र राज्याच्या काही भागातून सरसकट खरीप नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी उचल खात आहे.त्यानुसार आ.काळे यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरीकांना कमाल मदत द्यावी याबाबतची मागणी केली आहे व तसे निवेदन दिले आहे.

  त्यासाठी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून तातडीने मदत मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यापूर्वीही आपल्या सहकार्यामुळे मतदार संघातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची योग्य नुकसान भरपाई मिळालेली आहे.दरम्यान सदर मागणीला उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव आल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे आ.काळे यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close