नैसर्गिक आपत्ती
…या तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळाचे थैमान,दोन महिला जखमी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आजही अवकाळी पावसाचे थैमान थांबलेले नसून आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास पूर्वेकडील करंजी आणि परिसरात झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी गायीचे गोठे,कांदाचाळी,ट्रॅक्टर वर झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी घरांची पत्रे उडून गेले असून यात आशा परमेश्वर मापारी (वय-३०) व उषा गोपीनाथ ढोले (वय-३२) या दोन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.एका बाजूला उष्णता आहे तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पाऊस कोसळत आहे.दरम्यान हा अवकाळीचा जोर राज्यात आणखी राज्यातील विविध भागात पुढील दोन दिवसापर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.कोपरगाव तालुक्याच्या संवत्सरसह पूर्व भागाला अवकाळी पावसाने चांगले झोडपले असून नुकत्याच झालेल्या पावसाने बक्तरपूर शिवारात पडलेल्या विजेमुळे एक गाय व तीन मेंढ्यांना आपला जीव गमवावा लागला असताना आज दुपारी २.३० वाजेच्या सुमारास आणखी एक तडाखा दिला असून यात करंजी भागातील शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान त्यात अनेक ठिकाणी गायीचे गोठे,कांदाचाळी,ट्रॅक्टर वर झाडे उन्मळून पडली असून अनेक ठिकाणी घरांची पत्रे उडून गेले असून यात आशा परमेश्वर मापारी व उषा गोपीनाथ ढोले या दोन महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर कोपरगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
दरम्यान यात पढेगाव येथील वादळी पावसाने परमेश्वर दगु किसन मापारी यांचे घराचे पत्रे उडून गेले आहे.तर करंजी बु.येथील अविनाश किसन भिंगारे यांचे ट्रॅक्टरवर लिंबाचे झाड कोसळले असून त्यात त्याचे अंशतः नुकसान झाले आहे.तर करंजी येथील कांदा चाळीवर बाभळीचे झाड कोसळून मोठे नुकसान झाले आहे.भाऊसाहेब कोंडीराम सोनार यांचे गायीच्या गोठ्यावर लिंबाचे झाड कोसळले असून त्यात त्यांचे अंशतः नुकसान झाले आहे.तर राहुल बबन कासार,दत्तात्रय बबन कासार यांचे घराचे पत्रे उडून गेले असून त्यांचा प्रपंच उघडयावर आला आहे.तीच बाब नानासाहेब सखाहरी आगवन यांची झाली आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून या ठिकाणी महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान या घटनास्थळी तहसील कार्यालयाचे कामगार तलाठी सतीश गायके घटनास्थळी रवाना झाले असून त्यांनी पंचनामे केले असल्याची माहिती तहसलीदार संदीपकुमार भोसले यांनी दिली आहे.