जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

पुरस्काराच्या ऊर्जेचा विधायक उपयोग करू-औताडे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सहकारातील अग्रणी असलेल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत खारीचे योगदान देता आले आहे.व गरीब व गरजू नागरिकांच्या व्यापाऱ्यांच्या समस्या सोडवता आल्या याचे समाधान आहे.या पुरस्कारामुळे आपल्याला आणखी ऊर्जा मिळाली असून त्याचा आपण आगामी काळात विधायक उपयोग करू असे आश्वासन चंद्रपंढरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तमराव औताडे यांनी पोहेगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“आपल्याला सहकारी पतसंस्था चळवळीमुळे मिळालेला पुरस्कार हा जबाबदारी वाढवणारा आहे.आपण अत्यंत प्रतिकूल काळात पोहेगाव सारख्या ग्रामीण भागात आधी व्यवसाय उभा केला व नंतर सहकारी चळवळ उभी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेत नक्कीच योगदान देता आले आहे”-उत्तमराव औताडे,अध्यक्ष,चंद्रपंढरी सहकारी पतसंस्था पोहेगाव.

कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रहिवासी व कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अध्यक्ष असताना आपल्या कार्याचा ठसा सर्वदूर उमटविणारे माजी सभापती,नगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते व चंद्रपंढरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक उत्तमराव औताडे यांना नुकताच सन-२०२२ चा आयकॉन पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्याबद्दल त्यांचा पोहेगाव येथील ग्रामस्थानीं सत्कार केला त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सचिन रोहमारे,एम.टी.रोहमारे,संचालक प्रवीण शिंदे,गंगाधर औताडे,मधुकर औताडे,संजय रोहमारे,भाऊसाहेब सोनवणे,बाळासाहेब औताडे,शरद पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष देवेन रोहमारे,गौतम सहकारी बँकेचे संचालक सुरेश भालेराव,उत्तम भालेराव,राजेंद्र औताडे,आदिसंह बहुसंख्य नागरिक व हितचिंतक उपस्थित होते.

दरम्यान उत्तमराव औताडे यांचे कार्य पाहून त्यांना माजी आ.अशोक काळे यांनी त्यांना तालुक्यातून अनेक दिग्गजांचा विरोध असताना कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बिनविरोध निवडून आणून त्यांना थेट कोपरगाव बाजार समितीचे अध्यक्ष बनवले होते.त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक हितैशी निर्णय घेतले होते.त्यामुळे अनेक संधीसाधूंची दुकाने बंद झाली होती.तरीही त्यांनी शेतकरी हिताचे अनेक निर्णय नेटाने राबवले होते.व लक्षणीयरीत्या उत्पन्न वाढवले होते.या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याचा सार्थ गौरव झाला असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान औताडे यांच्या या पुरस्काराबाबत चंद्रपंढरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की,”आपल्याला सहकारी पतसंस्था चळवळीमुळे मिळालेला पुरस्कार हा जबाबदारी वाढवणारा आहे.आपण अत्यंत प्रतिकूल काळात पोहेगाव सारख्या ग्रामीण भागात आधी व्यवसाय उभा केला व नंतर सहकारी चळवळ उभी करण्याचा निर्णय घेतला होता.त्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेत नक्कीच योगदान देता आले आहे.त्यामुळे आगामी काळात आणखी काम उभे राहील असा विश्वास त्यांनी औताडे यांनी शेवटी व्यक्त केला आहे.

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक सचिन रोहमारे यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन प्रवीण शिंदे,एम.टी.रोहमारे,गंगाधर औताडे,मधुकर औताडे आदींनी केले आहे.तर उपस्थित्यांचे आभार नंदकिशोर औताडे यांनी मानले आहे.त्यांच्या या निवडीचे माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे आदिसंह अ.नगर जिल्ह्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close