निवड
…या दांपत्यास “नागरे प्रतिष्ठानचा ‘जीवन गौरव पुरस्कार’

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील स्व.ग.वि.तथा लहानुभाऊ नगारे यांच्या ८५ व्या जयंती निमित्त शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठान व रेनबो इंटर नॅशनल स्कूल यांच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा प्रतिष्ठेचा,’जीवन गौरव पुरस्कार’ कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे व शिलाताई कुदळे या दाम्पत्यास देण्यात येणार असल्याचे प्रतिष्ठानच्या वतीने नुकतेच जाहीर करण्यात आले आहे.
माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांचे सामाजिक जीवन व कार्य अगदी वादातीत राहिले आहे.कुदळे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मोठे आहे.रयत शिक्षण संस्थाचे जनरल बॉडी सदस्य,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशी अनेक पदे भूषविली आहे.ते अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेचे मुख्य विश्वस्त आहेत.या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्थ साहाय्य करणे,कोपरगाव येथील माळी बोर्डिंगच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना कोपरगाव आणि पुण्यासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांची राहण्याची तसेच शिक्षणाची सोय करणे आदींचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती देताना प्रतिष्ठानचे सचिव संजय नागरे यांनी सांगितले की,”लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठानचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते,”श्री व सौ.कुदळे यांना त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल सोमवार दिनांक २७ मार्च रोजी संध्याकाळी ६ वा.’साई सृष्टी लॉन्स’ येथे प्रदान करण्यात येणार आहे.
माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांचे सामाजिक जीवन व कार्य अगदी वादातीत राहिले आहे.कुदळे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य मोठे आहे.रयत शिक्षण संस्थाचे जनरल बॉडी सदस्य,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशी अनेक पदे भूषविली आहे.ते अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेचे मुख्य विश्वस्त आहेत.या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अर्थ साहाय्य करणे,कोपरगाव येथील माळी बोर्डिंगच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना कोपरगाव आणि पुण्यासारख्या ठिकाणी विद्यार्थ्यांची राहण्याची तसेच शिक्षणाची सोय करणे,तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीमध्ये सर्व सामान्य जनतेला दिलासा देण्यासोबतच त्यांच्या पाठीमागे ते खंबीरपणे उभे राहिले आहे.
दरम्यान कुदळे यांच्या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी शिलाताई कुदळे या सतत खंबीर साथ देत आल्या आहेत. शिलाताई यांनी महिलांसाठी ३५ वर्षांपूर्वी धनश्री महिला नागरी सहकारी पतसंस्था सुरु केली आहे.या पतसंस्थेमाद्वारे त्यांनी महिलांसाठी प्रगतीची एक नवी वाट तयार करून दिली.सद्यस्थितीत धनश्री महिला पतसंस्था महिलांच्या प्रगतीसाठी सुरु असणारी परिसरातील एकमेव संस्था ठरावी.शिलाताईंनी पतसंस्थेद्वारे नफा कमावण्यापेक्षा महिलांना आपल्या पायावर उभे करून समाजात त्यांचे स्थान भक्कम करण्यास अधिक प्राधान्य दिले आहे.याच सोबत त्यांनी त्यांच्या याच प्रयत्नामुळे कोपरगाव सारख्या तालुक्यातून अनेक महिला उद्योजिका उभ्या राहिल्या आहेत. पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळाचे सदस्य म्हणून ३ वर्षे काम केली.वनिता मंडळाच्या सलग दोन वर्षे अध्यक्षपद,महिला मंडळांना शासनाच्या विविध योजनांचे मार्गदर्शन,कोपरगाव न्यायालयाच्या लोकन्यायालय पॅनलवर तीन वर्षे सदस्य पदी काम,गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दरवर्षी वह्या पुस्तके,तसेच शालेय साहित्य वाटप करणे , दुष्काळी परीस्थितीत तालुक्यातील अनेक खेड्यांमध्ये व शहरात टँकरद्वारे मोफत पाणी वाटप करणे,विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन,महिला दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्यशिबिराचे आयोजन करणे याव्यतिरिक्त त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत असे असतानाही कुदळे दाम्पत्य कायम प्रसिद्धी पासून दोन हात दूरच राहत आले आहेत.त्यांच्या याच कार्यकर्तृत्वाचा गौरव म्हणून,’ स्व.ग.वि.तथा लहानुभाऊ नागरे जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येत आहे.