जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात पुन्हा कोरोनाचे दोन बळी,रुग्णसंख्या थंडावली

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात ४१९ रॅपिड टेक्स्ट करण्यात आल्या असून त्यात ०४ रुग्ण बाधित आढळले आहे.तर ४१५ रुग्ण निरंक निघाले आहे.तर नगर येथे ४०० स्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ०० तर अँटीजन तपासणीत ०४,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ०१असे एकूण अहवालात एकूण ०५ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १८ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहरात एक५४ वर्षीय पुरुष तर तालुक्यातील करंजी हद्दीतील एक ८० वर्षीय महिलेचा असा दोघां रुग्णांचा मृत्यू झाला आहे.हा मोठा शेवटी मोठा धक्का मानला जात आहे.उद्यापासून टाळेबंदी उठविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.त्यामुळे व्यापारी वर्गात समाधान पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १२ हजार ०६५ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील ३९८ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १९८ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.६४ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ७० हजार ७०५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०२ लाख ८२ हजार ८२० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा १७.०६ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ११ हजार ४६९ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ९५.०६ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ५५ हजार ६१९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या ०६ हजार ८३१झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०२ लाख ४५ हजार ३९४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०३ हजार ३९३ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.

दरम्यान आज आलेल्या माहितीनुसार राज्यातही तेरा हजारांच्या दरम्यान रुग्णवाढ रोडावली आहे.कोपरगावही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा सकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे. हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.तसेच मृत्युदर बऱ्यापैकी कमी झाला असताना आज तालुक्यात गत दोन-तीन दिवसात एकही बळी गेला नसताना आज पुन्हा दोन बळी नोंदवले गेले आहे हि बाब धक्का देणारी ठरली आहे.त्यामुळे आगामी काळ चिंताजनक असल्याचे दिसत असले तरी मात्र नगर जिल्हा देशातील सर्वाधिक बाधित जिल्ह्यात समाविष्ठ होता आता नगर जिल्ह्यात सरकारने येत्या सात जून पर्यंत टाळेबंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे व्यापारी व ज्यांचा रोजगार हिरावला गेला आहे असे नागरिक व व्यापारी संघटनांनीं समाधान व्यक्त केले आहे.दुसरीकडे लहान बालकांची कोरोनाची लाट कशी थोपवायची याचा विचार जिल्हा प्रशासनास करावा लागणार लागत असून त्यांनी या लाटेचा सामना करण्यास पूर्व तयारी सुरू केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close