जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

कोपरगावातील…यांची फुले-पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळावर निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव येथील स्थानिक के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रा.संतोष पगारे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळावर निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी दिली आहे.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रा.पगारे यांचे आत्तापर्यंत ६ पुस्तके व ४७ शोधनिबंध प्रकाशित झालेले असुन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकुण ६० पेक्षाही अधिक चर्चासत्रामध्ये त्यांनी शोध निबंधाचे वाचन व सहभाग नोंदविलेला आहे.वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल वाढवा यासाठी त्यांनी ४ पेटेंट प्रकाशित केलेले आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रा.संतोष पगारे हे मागील २२ वर्षापासून वाणिज्य विभागात कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी उद्योग,व्यवसाय व शिक्षण क्षेत्रात विविध पदावर कार्यरत आहे.महाविद्यालयाच्या शैक्षणिक विकासामध्ये तसेच नव-नवीन कोर्सेस सूरू करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे.त्यांचे आत्तापर्यंत ६ पुस्तके व ४७ शोधनिबंध प्रकाशित झालेले असुन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील एकुण ६० पेक्षाही अधिक चर्चासत्रामध्ये त्यांनी शोध निबंधाचे वाचन व सहभाग नोंदविलेला आहे.वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचा संशोधनाकडे कल वाढवा यासाठी त्यांनी ४ पेटेंट प्रकाशित केलेले आहे.

मागील काही वर्षांपासून त्यांनी प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून महाविद्यालयातील ६०० पेक्षा अधिक विद्यार्थांना मार्गदर्शनाद्वारे रोजगार उपलब्ध करून दिला आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुढील पाच वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची अभ्यास मंडळावर निवड झाली आहे.सावित्रीबाईं फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेतील पुणे,नाशिक व नगर या तीनही जिल्ह्यातून निवडणूक प्रक्रियेद्वारे त्यांची मताधिक्काने निवड झाली आहे.त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ऍड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close