जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

ग्रामस्थांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका-कोपरगावातील…या नेत्याचे आवाहन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

ग्रामपंचायत हद्दीतील मतदारांनी तुमच्यावर गावाच्या विकासाची जबाबदारी सोपविली आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घ्या व आले कसब पणाला लावून ग्रामविकास मंदिराचे विश्‍वस्त म्हणून काम करा असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल याचा सातत्याने आपण पाठपुरावा केला असून त्यातून पाठपुराव्यातून मतदार संघातील पाणी,रस्ते,आरोग्य आदी मुलभूत प्रश्न बऱ्याच अंशी सुटले आहे”-आ.आशुतोष काळे,विधानसभा मतदार संघ.

कोपरगाव विधानसभा मतदार संघातील नुकत्याच पार पडलेल्या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या काळे गटाचे १५ नवनिर्वाचित सरपंच व १३० सदस्यांबरोबरच सर्व उमेदवारांचा आ.काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.

सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,संचालक सुधाकर रोहोम,सूर्यभान कोळपे,सचिन चांदगुडे,श्रीराम राजेभोसले,सुभाष आभाळे,राहुल रोहमारे,प्रवीण शिंदे,शंकरराव चव्हाण,डॉ.मच्छिंद्र बर्डे, अनिल कदम,सुनील मांजरे,मनोज माळी,शिवाजी घुले,श्रावण आसने,गंगाधर औताडे,महिला संचालक वत्सला जाधव, इंदुबाई शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,माजी सभापती पौर्णिमा जगधने,शरद पवार पतसंस्थेचे अध्यक्ष राधू कोळपे,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,माजी संचालक ज्ञानदेव मांजरे,सचिन रोहमारे,मिननाथ बारगळ, सोमनाथ चांदगुडे,संजय आगवण,राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष चारुदत्त सिनगर,राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्षा वैशाली आभाळे आदी मान्यवरांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”विकास करायचा तर सत्ता हवीच हे आपण मागील तीन वर्षात कोपरगाव मतदार संघात झालेल्या विकासावरून पाहिलं आहे अनुभवलं आहे.मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल याचा सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून मतदार संघातील पाणी,रस्ते,आरोग्य आदी मुलभूत प्रश्न बऱ्याच अंशी सुटले असून या २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तब्बल १५ गावचे सरपंच व १३० सदस्य काळे गटाचे निवडून आले आहेत.मतदार संघाच्या उर्वरित विकासाच्या प्रश्नाचा निपटारा लावण्यासाठी माझा पाठपुरावा सुरूच असून येत्या काही दिवसात ते प्रश्न देखील लवकरच मार्गी लागतील.तुम्हीसुद्धा सर्वाना सोबत घेवून ग्रामविकास मंदिराचे विश्‍वस्त आहोत ही भावना मनात ठेवून केलेले काम निश्‍चित प्रभावी आणि लोकाभिमुख ठरेल व गावातील नागरिक नेहमीच तुमच्या सोबत राहतील असा विश्वास उपस्थित नवनिर्वाचित सरपंच,सदस्यांबरोबरच कार्यकर्त्यांना दिला.

यावेळी अनेक भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचा त्यांनी दावा केला असून यात यामध्ये भोजडे येथील विजय सिनगर,अविनाश मोरे,पोपट दुशिंग,अजय पवार,लखन आहेर,मंगेश सांगळे,विशाल घनघाव,राजेंद्र पवार,गणेश वाळुंज,रावसाहेब धट,अशोक धट,संतोष जगताप,शाहरुख शेख,जमील शेख,आसिफ शेख,जमीर शेख,निकेश घनघाव,बहादरपुर येथील राकेश रहाणे,कैलास रहाणे,बाबासाहेब रहाणे,गणपत रहाणे,रांजणगाव देशमुख येथील गोपाजी चतुर,सडे येथील माजी उपसरपंच सुनील बारहाते,चांदेकसारे येथील नारायण आल्हाट,शिंगणापूर येथील दिनेश जऱ्हाड या कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या सर्व कार्यकर्त्यांचा आ.काळे यांनी सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्तविक माजी संचालक ज्ञानदेव मांजरे यांनी केले.सूत्रसंचालन व आभार अरुण चंद्रे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close