जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी लबडे यांची निवड,ठाकरे सेनेच्या पचनी पडणार का ?

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

शिवसेनेच्या संपर्क पदी माजी मंत्री बबन घोलप यांची नवीन संपर्क प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी उत्तर नगर जिल्हा कार्यकारिणीत बदल केला असून त्यात जिल्हा प्रमुख उत्तर या पदावर आपले समर्थक म्हणून उपजिल्हाप्रमुख असलेले प्रमोद लबडे यांना बढती दिली आहे.तर तालुका प्रमुख म्हणून शिवाजी ठाकरे यांना पुन्हा एकदा संधी प्राप्त झाली आहे.तर शहर प्रमुख म्हणून सनी वाघ यांची पुन्हा एकदा निवड केली आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असताना या निवडी उद्धव सेनेच्या किती पचनी पडणार हे लवकरच कळणार आहे.

( प्रमोद लबडे) (शिवाजी ठाकरे ) (सनी वाघ)

“एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर ती लोकांना सत्य वाटू लागते.त्यामुळे आपल्या मुद्द्याचा सतत प्रचार करावा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा लोकांमध्ये प्रचार करत असतो,तेव्हा ती गोष्ट सोपी असायला हवी. फक्त काही ठळक मुद्दे असायला हवेत.आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ती गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा सांगायला हवी.”हे अॅडॉल्फ हिटलरचं प्रचाराबाबतचं सूत्र होतं त्या तंत्रात लबडे इतका वाकबगार सेनेत कोणी नाही त्यामुळे त्यांची वाटचाल आगामी काळात लवकर कळणार आहे.त्यावरच पुढील दिशा ठरणार आहे.

साडेतीन महिन्यांपूर्वी राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोठी बंडखोरी होऊन भाजप सेनेचे सत्ता राज्यात पुन्हा एकदा स्थापन झाली आहे.शिवसेनेला एवढा दणका कधीही बसला नव्हता.त्यातच शिर्डी लोकसभा मतदार संघात खा.सदाशिव लोखंडे यांनी सेना प्रमुखांना नाक खाजवून दाखविल्याने सेना नेतृत्व दुखावले आहे.त्याना असा दुसऱ्यांदा दणका बसला आहे.त्यामुळे विरोधी बाकावर गेलेल्या शिवसेनेला जाग आली आहे.व ठाकरे सेनेने अंग झटकले असून त्यांनी आपली भाकरी फिरविण्याचा निर्णय घेतला आहे.विशेषतः राज्यात सर्वात मोठा असलेला नगर जिल्हा त्यांच्या केंद्रस्थानी आलेला आहे.त्या जागी त्यांनी माजी सामाजिक न्याय विभागाचे माजी मंत्री बबन घोलप यांची निवड करून योग्य संदेश दिला आहे.त्यामुळे त्यांनी आता आगामी २०२४ ची लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यात सर्वात प्रबळ मानली जाणारी शिवसेना म्हणून कोपरगावचे नांव घेतले जात होते.त्या ठिकाणी आपले बस्तान बसविल्यावर आपली लढाई सोपी होईल असा त्यांचा कयास असावा.त्यानुसार त्यांनी भाकरी फिरविण्याचा खेळ कोपरगाव पासून सुरु केला आहे.कोपरगावात शिवसेनेचे दोन नव्हे तर अनेक गट आहेत.काळे आणि कोल्हे यांनी सेना पूर्वीच्या भाजप सारखी आधीच वाटून घेतली आहे.उरली सुरली सेना घेऊन घोलप यांना हि लढाई लढावयाची आहे.त्यामुळे आता पासून त्यांनी आपली हत्यारे पाजळली आहेत.हे दिसून येत आहे.आता जे गट आधी झावरे गटाच्या विरुद्ध जाऊन ज्यांनी आपली मोट व वज्र मूठ बांधली होती त्यांना अग्रभागी आणले आहे.नाही म्हणायला त्यांनी झावरे यांना तुटू न देता त्यांना बढती देऊन (की बढतीचे नाटक करून) आपला हेतू साधण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे.झावरे गटाची संस्थात्मक ताकद जास्त आहे.संघटनात्मक ताकद अलीकडील काळात कमी झाली आहे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.त्यामुळे कोण कोणाला मात देतो हे आगामी काळात कळणार आहे.मात्र हा संघर्ष उघड होणार नाही हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.शिवाजी ठाकरे हे ग्रामीण चेहरा असून ते आता झावरे गटापासून दुरावले असल्याची शक्यता जास्त आहे.त्यामुळेच त्यांची वर्णी लागली असल्याची शक्यता आहे.

घोलप यांना कोपरगावचा बऱ्यापैकी अभ्यास आहे.त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा उठवला आहे.त्यानुसार त्यांनी नेमकी गोम हेरली आहे.मात्र हे करताना ज्यांना त्यांनी पुढे आणले आहे.त्यांच्या मागे सेना किती रहाणार हे लवकरच समजणार आहे.यात माजी शहर प्रमुख कलविंदर दडियाल याना बाजूस सारले असल्याचे तूर्त दिसत आहे.तर एकेकाळी माजी आ.काळे याचे स्वीय सहाय्यक म्हणून गणले गेलेले प्रमोद लबडे याना पुढे आणले आहे.ते जुन्या सेनेला किती मानवणारे आहे हे लवकरच कळणार आहे.

“एखादी गोष्ट वारंवार सांगितली तर ती लोकांना सत्य वाटू लागते.त्यामुळे आपल्या मुद्द्याचा सतत प्रचार करावा. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा लोकांमध्ये प्रचार करत असतो,तेव्हा ती गोष्ट सोपी असायला हवी. फक्त काही ठळक मुद्दे असायला हवेत.आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ती गोष्ट सातत्याने पुन्हा पुन्हा सांगायला हवी.”हे अॅडॉल्फ हिटलरचं प्रचाराबाबतचं सूत्र होतं,जे प्रत्यक्षात उतरवणारा सूत्रधार होता जोसेफ गोबेल्स.या तंत्राचा वापर करण्यात ठाकरे सेनेचे नूतन जिल्हाध्यक्ष प्रमोद लबडे माहीर आहेत ते आपल्या सूत्राचा कसा वापर करतात व यश संपादन करतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहणार आहे.

आगामी काळात त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘बाळासाहेब सेने’ची मोठी धास्ती आहेच.या पुढील काळात भाजपचा निष्ठावान गट ( विजय वहाडणे) यात कोणत्या सेने बरोबर जाणार आहे की ‘कोल्हे सेने’त समाविष्ठ होणार आहे ते लवकरच कळणार आहे.आगामी काळात नगरपरिषद,जिल्हा परिषद,पंचायत समिती,बाजार समिती,आणि २६ ग्रामपंचायतीच्या निवडणूका आहे.मात्र ते काळे आणि कोल्हेच्या मागे गेलेल्या ठाकरे सेनेच्या पगारी शिलेदारांना कसे मागे फिरवणार ? हे त्यांच्यापुढचे मोठे आव्हान ठरणार आहे.व त्यासाठी ते कशी रणनीती राबवणार हे लवकरच समजणार आहे.त्यावरच त्यांची सगळी भिस्त आहे.त्यामुळे हे आव्हान ते कसे पेलणार हे लवकरच कळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close