निवड
कोपरगावातील शिंदे यांची काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदीं निवड !
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील रहिवासी असलेले काँग्रेस कार्यकर्ते व जिल्हा सरचिटणीस नितीन शिंदे यांची काँग्रेसच्या मानवी हक्क आयोग व आर.टि.आय.विभागाच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.त्यांना तसे पत्र नुकतेच महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाने त्यांना पाठवले आहे.त्यांच्या निवडीचे नगर जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान नितीन शिंदे यांनी चार वर्षांपूर्वी काँग्रेसच्या कोपरगाव तालुकाध्यक्षपदी लक्षवेधी कामगिरी केली होती.अनेक चूकीच्या प्रथा वरिष्ठ नेत्यांच्या लक्षात आणून देऊन त्या विरोधात कागदोपत्री आवाज उठवला होता व त्याची दखल घ्यायला भाग पाडले होते.त्याची दखल वरिष्ठ प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व अन्य नेत्यांनी घेतले असल्याचे दिसून आले आहे.
देशात वर्तमानात काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पायी दिंडी सुरु आहे.तर दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर अध्यक्षपदाची निवडून सुरु आहे.अशातच प्रदेश पातळीवर पक्षात जाण फुंकण्यायासाठी व नवं चैतन्य निर्माण करण्यासाठी नूतन संघटनेच्या कार्यकर्त्याना संधी देण्याचे ठरवले असून त्या नुसार प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी निर्णय घेऊन त्यात काँग्रेस अंतर्गत मानवी हक्क संघटना व आर.टि.आय.विभागाच्या राज्य सरचिटणीस पदी नितीन शिंदे यांची निवड जाहीर केले आहे.त्या बाबत त्यांनी तसे पत्र त्यांना दिले आहे.
दरम्यान या निवडीत अन्य पदाधिकाऱ्यांत त्यांनी अड्.विशिका अशोक रोडे,अड्.इस्माईल नसीम खान,सुप्रिया सिन्हा, कुलदीप एलसिंघानी,दिलीप कोटवानी,जितेश्वर आनंद,दत्ता तुपे आदींची निवड केली आहे.दरम्यान निवडीत त्यांनी जळगाव जिल्हा अध्यक्षपदी अश्फाक पटेल,तर सोलापूर जिल्हाध्यक्षपदी गजेंद्र गौतम खरात,तर जिल्हा सचिवपदी शुभम प्रकाश माने,रमाकांत बापट आदींची निवड केली आहे.
दरम्यान नूतन पदाधिकाऱ्यांचे राज्याचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले,मानवी हक्क व आर.टी.आय.विभागाचे राज्याध्यक्ष रवी प्रकाश जाधव यांचेसह राज्यभरातुन अभिनंदन होत आहे.