निवड
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा विद्यार्थी राज्यात दुसरा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी येथील रहिवाशी व औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिर्डीचा विद्यार्थी दिपक जगताप याने ट्रॅक्टर मेकॅनिक या व्यवसायिक प्रशिक्षण परीक्षा २०२२ मध्ये राज्यात दुसरा येण्याचा बहुमान मिळविला आहे त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दिपक जगताप हा अत्यंत सामान्य कुटुंबातील असुन आय.टी.आय.प्रशिक्षण घेत असतानाच शेती काम,किराणा दुकानात काम सायकलने दररोज सुमारे तिस कि.मी.वर प्रवास करून मिळालेल्या वेळेत अभ्यास करून त्याने हे यश मिळवले आहे.त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.नुकताच वारी ग्रामस्थांच्या वतीने दिपक जगताप व त्याचे वडील संतोष जगताप यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
यावेळी दिपक जगताप याने अविस्मरणीय क्षण असल्याचे सांगत आय.टी.आय.शिर्डीचे विभागाचे प्रमुख शिवशरण,गट निर्देशक जांभुळकर व प्राचार्य गुनाके आदींचे मार्गदर्शन व कुटुंबाची साथ असल्याचे सांगत वारी ग्रामस्थांनी यशाची दखल घेऊन सत्कार केल्या बद्दल ग्रामस्थांचे व सहकारी मित्रांचे विशेष आभार मानले आहे.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात वारीचे माजी सरपंच बद्रीनाथ जाधव,माजी पंचायत समिती सदस्य अशोकराव कानडे,बाळासाहेब वाकचौरे,वारी सोसायटीचे सदस्य अण्णासाहेब टेके,सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब खवले,राहुल कोकाटे,वैभव शेळके,वारीचे व्यापारी सुभाषराव कर्पे,कृष्णराव जाधव,कैलास लकारे,रामेश्वर जाधव,विठ्ठल जाधव,संतोष जगताप, गोपीनाथ जगताप,नवनाथ जगताप,सुभाषराव कर्पे,आकाश जगताप,प्रशांत जगताप,हरीभाऊ टेके,प्रशांत पवार,विलास वाकचौरे,संजय जगदाळे,शैलेश जगदाळे,महेश लुनावत यांचे सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.