निवड
इन्शुरन्स विभागीय व्यवस्थापक पदावर…यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनीधी)
कोपरगाव तालुक्यातील घारी येथील रहिवासी असलेले भगवान बयाजी पवार यांना भारत सरकारचा अंगीकृत व्यवसाय असलेल्या इन्शुरन्स क्षेत्रातील अग्रगण्य अश्या न्यू इंडिया ॲशुरन्स कंपनीच्या अ.नगर जिल्हा विभागीय व्यवस्थापक या पदावर नुकतीच बढती मिळाली असल्याने त्यांचे कोपरगाव तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.
इयत्ता पहिली पासूनच अत्यंत हुशार व जिद्द चिकाटी आणि वडील चुलते यांचे मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी पदवी नंतर ते इन्शुरन्स क्षेत्रातील परिक्षा उत्तीर्ण झाले व नासिक येथून आपल्या इन्शुरन्स क्षेत्रातील सेवेस प्रारंभ केला आणि आता आपल्याच जिल्ह्यात बढती मिळाली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
संगमनेर येथे शाखा व्यवस्थापक पदावर कार्यरत असतानाच त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांनी दिलेल्या अंतर्गत गुणवत्ता परिक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना अ.नगर येथे विभागीय व्यवस्थापक या पदावर बढती मिळाली होती.भगवान पवार यांचे दहावी पर्यंतचे शालेय शिक्षण संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल येथे झाले असून ते संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेज मधून बी.ई.(आय.टी.) पदवी विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.इयत्ता पहिली पासूनच अत्यंत हुशार व जिद्द चिकाटी आणि वडील चुलते यांचे मार्गदर्शनाखाली अभियांत्रिकी पदवी नंतर ते इन्शुरन्स क्षेत्रातील परिक्षा उत्तीर्ण झाले व नासिक येथून आपल्या इन्शुरन्स क्षेत्रातील सेवेस प्रारंभ केला आणि आता आपल्याच जिल्ह्यात बढती मिळाली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.
ते घारी येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी (बयाजी) पवार यांचे ते चिरंजीव असून टॅक्स सल्लागार काकासाहेब पवार,पत्रकार किसन पवार व विनायक पवार यांचे ते पुतणे आहेत.त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.