निवड
मोठे ध्येय कठीण परिश्रमाने गाठता येते-..यांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
प्रतिकूल परिस्थितीतही अपेक्षित असलेले मोठे ध्येय कठीण परिश्रमाने गाठता येत असल्याचे प्रतिपादन श्री साईबाब विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच कोळपेवाडी येथील एका सत्कार प्रसंगी केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील विद्यार्थिनी कु.कोमल वाकचौरे हिची होमी भाभा नॅशनल रिसर्च सेंटर,मुंबई येथे अणु औषध शास्त्रज्ञ (प्रथम वर्ग राजपत्रित अधिकारी) म्हणुन निवड झाली असून तिचा सत्कार आ.काळे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीप बोरनारे,भानुदास वाकचौरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलता ते म्हणाले की,”ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देखील कुशाग्र बुद्धिमत्ता असते. केवळ आवश्यक सोयी सुविधा मिळत नसल्याचा बाऊ न करता आपले ध्येय गाठण्यासाठी परिस्थिती तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यास रोखू शकत नाही हेच कोमल वाकचौरे या युवतीने दाखवून दिले असून तिने आकाशाला गवसणी घालण्याची कामगिरी करून दाखविली आहे.याचा समस्त कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना अभिमान असून होतकरू विद्यार्थ्यांनी कोमलचा आदर्श घ्यावा असे आवाहन आ. काळे यांनी शेवटी केले आहे.