निवड
कोपरगाव तालुक्यातील वारी नजीक असलेल्या सेवा संस्थेची निवडणूक संपन्न

न्यूजसेवा
वारी-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी गावातील आंबिका सोसायटीची निवडणूक माजी सभापती मच्छिंद्र टेके यांच्या अध्यक्षतेखाली बिनविरोध झाली असून अंबिका सोसायटीने बिनविरोध निवडणूकीची परंपरा कायम राखल्याने सभासदांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले आहे.
करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा तिसरा टप्पा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. तिसऱ्या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत.त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील वारी सहकारी सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.
करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा तिसरा टप्पा राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केला आहे. तिसऱ्या टप्प्यात २७ हजार १३८ सहकारी संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत.त्यामध्ये साखर कारखाने,पतसंस्था,नागरी सहकारी बँका,सहकारी सूतगिरण्या,सहकारी दुग्ध संस्था,कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा समावेश आहे.प्रलंबित निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश प्राधिकरणाचे अध्यक्ष यांनी दिले आहेत.त्यानुसार वारी सहकारी सेवा संस्थेची निवडणूक नुकतीच मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. या निवडणुकीत माजी सभापती मच्छिंद्र टेके यांनी अल्पसंख्याक सभासदाना विशेष न्याय दिल्याने अल्पसंख्याक सभासदांनि समाधान वेक्त केले आहे.या निवडणुकीत संचालक म्हणून माजी सभापती मच्छिंद्र टेके,वसंतराव गोरे,रवींद्र गोर्डे,जयेश वालझाडे,दत्तात्रय ठोंबरे,दिलीप टेके,ललिता नानासाहेब टेके,मच्छिंद्र टिक्कल,वाल्मिक भाकरे,बाळासाहेब आवारे,रंजना अनिल गोरे,सविता बाबासाहेब टिक्कल,सुभाष डहारे आदी संचालकांची बिनविरोध निवड झाली या वेळी सोसायटीचे सर्व वरिष्ठ सभासद व भाजप गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते.