जाहिरात-9423439946
निवड

गवारे मामा फौडेशनच्या अध्यक्षपदी…यांची निवड !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव येथील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या गवारे मामा फौडेशनच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध व्यापारी फुलचंद पांडे यांची व या बरोबरच उपाध्यक्ष म्हणून शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते हेमंत बोरावके यांची पण एकमताने निवड केली असल्याची  माहिती उपलब्ध झाली आहे.या शिवाय विश्वस्त पदाच्या एका रिक्त जागी लेखा परीक्षक दत्तात्रय खेमनर यांची निवड करण्यात आली आहे.

डावीकडून हेमंत बोरावके,फुलचंद पांडे,पुरुषोत्तम पगारे,ज्योत्स्ना पगारे,लतिका जोशी आदी मान्यवर दिसत आहे.

गवारे मामा फौडेशनच्या वतिने कोपरगाव शहरात शालाबाह्य मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी रात्र शाळेच्या माध्यमातून गेल्या ३३ वर्षापासून कार्य सुरू आहे.त्याज बरोबर परित्यक्ता स्रियांचे प्रश्न सोडविणे,फौडेशन सभागृहात विविध आरोग्य विषयक शिबीरांचे आयोजन केले जाते.

  या निवडी नंतर फौडेशन कार्यालयात फौंडेशनचे संस्थापक सचिव पुरुषोत्तम पगारे यांच्या हस्ते अध्यक्ष फुलचंद पांडे व उपाध्यक्ष हेमंत बोरावके यांचा पुष्पगुच्छ व शाल देवून सन्मान करण्यात आला आहे.

   सदर प्रसंगी लतिका जोशी व ज्योत्स्ना पगारे या उपस्थित होत्या.गवारे मामा फौडेशनच्या वतिने कोपरगाव शहरात शालाबाह्य मुला मुलींना शिक्षण देण्यासाठी रात्र शाळेच्या माध्यमातून गेल्या ३३ वर्षापासून कार्य सुरू आहे.त्याज बरोबर परित्यक्ता स्रियांचे प्रश्न सोडविणे,फौडेशन सभागृहात विविध आरोग्य विषयक शिबीरांचे आयोजन केले जाते.सर्वसामान्य माणसांच्या मुला मुलीच्या  साखरपुडा व विवाहासाठी सहकार्य केले जाते.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
   

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close