निवड
राज्य कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी…यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ॲमेचर कबड्डी फाउंडेशन ऑफ इंडिया,महाराष्ट्र राज्याच्या कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सहकार महर्षी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.खेळ,त्यांच्या या निवडीचे क्रीडा क्षेत्रातून स्वागत होत आहे.

संस्था मराठी मातीतील खेळ असलेल्या कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी 'प्रो कबड्डी' आणि 'भारतीय कबड्डी महासंघा'सोबत समन्वय साधते.राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धांचे आयोजन करणेसह खेळाडूंची निवड प्रक्रिया राबवून महाराष्ट्र संघाची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड करते.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ही महाराष्ट्रातील कबड्डी खेळाचे नियंत्रण आणि संचालन करणारी मुख्य संस्था आहे.या संस्थेचा उद्देश हा महाराष्ट्रात कबड्डी खेळाचा प्रसार करणे,ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देणे आणि राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करणे आदी असून ही संस्था मराठी मातीतील खेळ असलेल्या कबड्डीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी ‘प्रो कबड्डी’ आणि ‘भारतीय कबड्डी महासंघा’सोबत समन्वय साधते.राज्यस्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धांचे आयोजन करणेसह खेळाडूंची निवड प्रक्रिया राबवून महाराष्ट्र संघाची राष्ट्रीय स्पर्धांसाठी निवड करून पंच आणि प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करत असते.
सन-२०२५ ते २०२९ या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य ॲमेचर कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची निवड झाली आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली नव्या कार्यकारिणीची रचना करण्यात आली असून,याच कालावधीत कबड्डी असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी विवेक कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही निवड कबड्डी चळवळीला बळ देणारी ठरणार असल्याचे बोलले जात आहे.विवेक कोल्हे यांच्या या अनुभवाचा आणि दूरदृष्टीचा लाभ आता कबड्डी क्षेत्रालाही होणार आहे.
या निवडीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कबड्डी खेळाच्या विकासाला नवी दिशा मिळेल,असा विश्वास व्यक्त केला जात आहे.ग्रामीण व शहरी भागातील होतकरू खेळाडूंना योग्य व्यासपीठ,प्रशिक्षण,स्पर्धात्मक संधी आणि संघटनात्मक पाठबळ देण्यासाठी चांगली धोरणे राबविली जातील,अशी अपेक्षा क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली आहे.



