निवड
राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी…यांची निवड जाहीर !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उत्तर अहिल्यानगर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी कोपरगाव येथील संदीप वर्पे यांची निवड त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे यांनी केली असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार यांनी दिली आहे.त्यांच्या निवडीचे उत्तर नगर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे.

ऍड.संदीप वर्पे यांनी अहील्यानगर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष,प्रक्ष प्रतोद आदी पदे भूषवली आहे.त्यांनी आ.काळे गटात असताना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे कार्यकाळात स्वीकृत नगरसेवकपद भूषवले होते व आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने सभागुह दणाणून सोडले होते.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आरक्षण जाहीर झाले आहे.नगरपालिकांच्या निवडणुकांच्या याद्या अंतिम होत आहे.त्यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कान टवकारले असून आपल्या रिक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे.त्याला शरद पवार राष्ट्रवादी गटही अपवाद नाही.त्यांनीही कंबर खोचली असून आपल्या पदाधिकाऱ्यांच्या शिडात हवा भरण्याचे काम सुरू केले आहे.उत्तर अहील्यानगर जिल्हा त्याला अपवाद नाही.राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी नुकताच आ.रोहित पवार यांच्यात झालेल्या मतभेदातून आपला राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती.त्यानंतर या जागी कोणाची नेमणूक होणार याकडे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून होते.त्यानंतर झालेल्या घडामोडीतून या जागी ऍड.संदीप वर्पे यांची वर्णी लागली आहे.या आधी वर्पे यांनी अहील्यानगर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष,प्रक्ष प्रतोद आदी पदे भूषवली आहे.त्यांनी आ.काळे गटात असताना नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचे कार्यकाळात स्वीकृत नगरसेवकपद भूषवले होते व आपल्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाने सभागुह दणाणून सोडले होते.

त्यांच्या निवडीचे पक्षाचे संस्थापक खा.शरद पवार,खा.सुप्रिया सुळे,माजी प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील,प्रदेशाध्यक्ष आ.शशिकांत शिंदे,आ.रोहित पवार,खा.निलेश लंके,माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे,पक्षनिरिक्षक अंकुश काकडे,तालुकाध्यक्ष बापूसाहेब रांधवणे,युवा आघाडीचे जिल्हा कार्यक्षयक्ष सुनील वर्पे आदींनी अभिनंदन केले आहे.संदीप वररपे यांनी आपल्यावर पक्षाच्या नेत्यांनी ही जबाबदारी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहे.व पक्ष वाढीला त्याचा फायदा करून ग्रामीण भागात पक्षाचे संस्थापक खा.शरद पवार यांचे विचार पसरविण्याचे काम नक्की करू असे आश्वासन दिले आहे.
————————————-
पत्रकार नानासाहेब जवरे यांच्या विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा‘ वाचा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*.
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.



