जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निवड

देवाभाऊ फाउंडेशनच्या लोकसभा समन्वयक पदी …यांची निवड !

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  राज्यात देवाभाऊ मित्र मंडळाची नुकतीच स्थापना मुख्यसमन्वयक गजानन जोशी यांनी केली असून उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहे.त्यात भाजप सोशल मिडिया सेलचे कार्यकर्ते समीर आंबोरे यांची शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या समन्वयकपदी वर्णी लागली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

नूतन समन्वयक समीर आंबोरे.

दरम्यान नूतन शिर्डी लोकसभा समन्वयक समीर आंबोरे यांची भाजप सोशल मिडिया सेल या संघटनेत चांगली पकड असल्याचे मानले जाते शिवाय सामाजिक व पक्षाच्या कार्यासह वरिष्ठ नेत्यांच्या वर्तुळात मोठे योगदान व स्थान राहिले आहे.त्याची वरिष्ठ नेत्यांनी दखल घेतल्याचे मानले जाते.

  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विचाराच्या कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी या फाउंडेशनची नागपूर येथे स्थापना केल्याचे मानले जाते.त्यांची राज्याची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून त्यात उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकारी जाहीर केले आहे.त्यात भाजपच्या राज्य सोशल मिडिया सेलचे सदस्य व उत्तर महाराष्ट्राचे माजी समन्वयक समीर आंबोरे यांची शिर्डी लोकसभा समन्वयकपदी ही निवड जाहीर करण्यात आली आहे.

  दरम्यान त्यांचे सोबतच दक्षिण लोकसभा मतदार संघाचे समन्वयक म्हणून कर्जत येथील कार्यकर्ते गणेश जायभायें यांची निवड जाहीर झाली आहे.या शिवाय नाशिक लोकसभेमध्ये नरेंद्र आहेर तर दिंडोरी मधून पवन अहिरराव,धुळे येथून मयूर सूर्यवंशी,जळगाव मधून गिरीश नारखेडे,रावेर मधून पंकज कोळी, नंदुरबार मधून निलेश प्रजापती आदींची निवड जाहीर केली असून प्रसिद्धी पत्रकावर संस्थापक गजानन जोशी,प्रदेशसह समन्वयक(संघटक), प्रदेश सहसमन्वयक डॉ.आशुतोष घोलप आदींच्या सह्या आहेत.

  कोपरगाव येथील कार्यकर्ते व नूतन समन्वयक समीर आंबोरे यांच्या निवडीचे कोपरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,माजी शहराध्यक्ष विनायक गायकवाड,माजी तालुकाध्यक्ष सुभाष दवंगे,नामदेवराव जाधव,ॲड.जयंत जोशी,प्रभाकर वाणी,योगेश वाणी आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close