निवड
कोपरगावात दहीहंडी उत्सव समिती जाहीर!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात दहीहंडी’उत्सव सोहळा २०२५ च्या आयोजनाची तयारी सुरू झाली असून अजित पवार गटाच्या आ.आशुतोष काळे यांच्या गटाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी शुभम काळे तर कार्याध्यक्षपदी राहुल चवंडके व राहुल शिरसाठ तर उपाध्यक्षपदी साजिद शेख,तन्मय साबळे व योगेश शेलार यांची निवड करण्यात आली आहे.

दहीहंडी हा महाराष्ट्रात गोपाळकाला किंवा गोविंदा उत्सव म्हणूनही ओळखला जाणारा एक महत्वाचा उत्सव आहे. हा उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांशी संबंधित आहे आणि दहीहंडी फोडणे हा या उत्सवाचा एक महत्वाचा भाग आहे.कोपरगाव शहरातही दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
दहीहंडी हा महाराष्ट्रात गोपाळकाला किंवा गोविंदा उत्सव म्हणूनही ओळखला जाणारा एक महत्वाचा उत्सव आहे. हा उत्सव भगवान श्रीकृष्णाच्या बाललीलांशी संबंधित आहे आणि दहीहंडी फोडणे हा या उत्सवाचा एक महत्वाचा भाग आहे.कोपरगाव शहरातही दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

या दिवशी,गोविंदा पथके शहरात विविध ठिकाणी दहीहंडी फोडण्यासाठी फिरतात.कोपरगावमधील दहीहंडी उत्सवात तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी होतात.
हा उत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि कृष्णाच्या बाललीलांची आठवण करून देतो.दहीहंडी फोडण्याची स्पर्धा पाहण्यासाठी आणि गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते. त्यासाठी विविध संघटना बऱ्याच आधी नियोजन करून आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवतात.आधी या उत्सवाची कार्यकारिणी जाहीर करत असतात.राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नियोजन आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून त्याची बैठक गौतम सहकारी बँकेच्या सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाली त्यावेळी त्यांनी आपली कार्यकारिणी जाहीर केली आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रसेचे पदाधिकारी, माजी नगरसेवक वकार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान सदर बैठकीत अन्य पदाधिकारी पुढील प्रमाणे:खजिनदारपदी मयूर राऊत, सदस्यपदी रहेमान कुरेशी,रोशन शेजवळ,विजय नागरे,हर्षल जैस्वाल,कार्तिक सरदार,संतोष दळवी,नितीन शेलार,सुनिल वैरागळ, ऋषिकेश खैरनार,ओम आढाव,दादा पोटे,शिवाजी लकारे,संकेत कहार,प्रसाद रुईकर,सोमेश शिंदे, मोहसिन शेख,रवी शिंदे, प्रदीप थोरात,तेजस गंगुले,आण्णा मासाळ,परवेज शेख,पवन राऊत,तेजस साबळे,अभिषेक कोकाटे,शुभम लासुरे,हरीश वाकचौरे,अमेय आढाव,अमीर पठाण,शफिक शेख,युसुफ शेख,युवराज शिरसाठ,वसीम शेख, विवेक फंड,सागर गायकवाड,असलम शेख,अथर्व कांबळे,तालिक शेख,योगेश शेलार,शुभम जोशी यांची निवड करण्यात आली आहे.
या दहीहंडी उत्सव सोहळ्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.