निवड
शिवसेनेची तालुका कार्यकारिणी जाहीर !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील कार्यकारिणी तालुकाध्यक्ष गंगाधर रहाणे,संजय दंडवते यांनी संयुक्तपणे जाहीर केली असून त्यात बाळासाहेब मापारी -उपतालुकाप्रमुख,पूर्व विभाग);विवेक कुलकर्णी,-उपतालुकाप्रमुख,पश्चिम विभाग,कैलास गव्हाणे -तालुका सचिव आदींचा समावेश आहे.नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान यासंह अंगीकृत संघटनेत (युवासेना) सिद्धार्थ शेळके (उपजिल्हा युवा अधिकारी);विजय गोर्डे (तालुका युवा अधिकारी); शेखर कोलते (शहर युवा अधिकारी); (ग्राहक संरक्षण कक्ष) अशोक कर्णा पवार (उपजिल्हा संघटक); अभिषेक रमेश शिंदे (तालुका संघटक); रविंद्र कथले (शहर संघटक); (शेतकरी सेना) धर्मा जावळे (तालुकाप्रमुख); रविंद्र देवकर (उपतालुकाप्रमुख); प्रवीण चौधरी (तालुका संघटक) आदी पदाधिकारी यांना सोबत घेऊन तालुक्यातील शिवसेना अधिक मजबूत करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
गेल्या तीन वर्षापासून अधिक काळ रखडलेल्या ग्रामीण भागातील महत्वाच्या असणाऱ्या नागपरिषदा,जिल्हा परिषद,पंचायत समित्याच्या निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे.या निवडणुकीसाठी जिल्हा गट आणि गणाची प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.यात २०२२ च्या जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियमातील दुरूस्तीनूसार प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे जास्ती जास्त ७५ तर कमीत कमी ५० गट राहणार आहे.त्यात्या ठिकाणी असणाऱ्या लोकसंख्येच्या प्रमाणात हे गट निश्चित करण्यात येणार आहे.त्यामुळे राज्यातील सर्वच पक्ष आणि संघटना सक्रिय झाल्या असून त्यांनी आपले भाले,तलवारी बाहेर काढल्या आहेत.सोबत घोड्यांचा तंग तोबरा, नाल,मेख आदींची गोळाबेरीज केली आहे.राऊतांची कमी नको,सरदार,दरकदार लढाईला हवेच हवे हा ठराव करून त्यांच्या नेमणुका पार पडत आहे.त्याची अनुभूती आली असून उबाठा सेना आता ताक फुंकून पिताना दिसत आहे. हे साप्ताहिक बैठकीत दिसून आले आहे.माजी तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे यांनी हाती घड्याळ बांधल्याने सर्वच सावध झाले आहेत.परिणामस्वरूप यात वरिष्ठ पदाधिकारी शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेत आहेत.यात कोपरगाव तालुक्यातील गट आणि गणातील रचना जाहीर करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणे सुरु केले असल्याची चर्चा आहे.
दरम्यान निवड झालेले पदाधिकारी खालीलप्रमाण-बाळासाहेब मापारी (उपतालुकाप्रमुख,पूर्व विभाग);विवेक कुलकर्णी,(उपतालुकाप्रमुख,पश्चिम विभाग) कैलास गव्हाणे (तालुका सचिव),यासंह गटप्रमुख अनुक्रमे श्रावण कदम (संवत्सर गट);मच्छिन्द्र देवकर (ब्राम्हणगाव गट); अंकुश चांदगुडे (सुरेगाव गट); शब्बीर शेख (शिंगणापूर गट),नवनाथ औताडे (पोहेगाव गट) यांच्यासह १० गणातील गणप्रमुख अनुक्रमे मछिंद्र वाळुंज (संवत्सर गण);विठ्ठल निकम (वारी गण);तुषार वाबळे (ब्राम्हणगाव गण); भाऊसाहेब दत्तात्रय कापसे (करंजी गण),देविदास मोरे (सुरेगाव गण),प्रवीण गंभीरे (धामोरी गण); श्री.सीताराम आनंद तिपायले (शिंगणापूर गण);,भाऊसाहेब यादव होरे (कोळपेवाडी गण); संजय बाळाजी गुंजाळ (पोहेगाव गण); अप्पासाहेब काशिनाथ होन (चांदेकसारे गण) आदींची निवड जाहीर केली आहे.
दरम्यान यासंह अंगीकृत संघटनेत (युवासेना) सिद्धार्थ शेळके (उपजिल्हा युवा अधिकारी);विजय गोर्डे (तालुका युवा अधिकारी); शेखर कोलते (शहर युवा अधिकारी); (ग्राहक संरक्षण कक्ष) अशोक कर्णा पवार (उपजिल्हा संघटक); अभिषेक रमेश शिंदे (तालुका संघटक); रविंद्र कथले (शहर संघटक); (शेतकरी सेना) धर्मा जावळे (तालुकाप्रमुख); रविंद्र देवकर (उपतालुकाप्रमुख); प्रवीण चौधरी (तालुका संघटक) आदी पदाधिकारी यांना सोबत घेऊन तालुक्यातील शिवसेना अधिक मजबूत करण्यात आली असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान सर्वं नवनिर्वाचित कार्यकारिणीचे खा. भाऊसाहेब वाकचौरे,संपर्कप्रमुख सुनील शिंदे,सहसंपर्कप्रमुख राजेंद्र झावरे,ग्राहक संरक्षण कक्षाचे प्रांतिक सदस्य मुकुंद सिनगर,जिल्हा समन्वयक कलविंदर दडीयाल,उपजिल्हाप्रमुख श्रीरंग चांदगुडे, तालुका समन्व्ययक अशोक कानडे,शहरप्रमुख सनी वाघ,वाहतूक सेनेचे इरफान शेख,प्रवीण शिंदे,गिरीधर पवार,कृष्णा आहिरे,सचिन आसने आदींनी अभिनंदन केले आहे.