निवड
…या वकील संघाचा पदग्रहण सोहळा संपन्न !

न्युजसेवा
कोपरगाव -(नानासाहेब जवरे)
कोपरगाव वकील संघाच्या एका युवा सदस्य अँड .बाबासाहेब जाधव यांचे निधन झाल्याने आज कोपरगाव वकील संघाचा पदग्रहण समारंभ साध्या पद्धतीने मात्र मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
कोपरगाव वकील संघाचे मावळते अध्यक्ष ॲड.अशोकराव वहाडणे यांनी व त्यांच्या अन्य पदाधिकारी सदस्यांनी आपल्या काळात मोठ्या न्यायालयीन इमारतीस गती दिली होती.त्यांचे कौतुक करून बाकी सदस्यांनी नूतन अध्यक्ष ॲड.शरद गुजर व त्यांच्या नूतन सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
कोपरगांव वकिल संघ निवडणूकीत आपले नामनिर्देशन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी आपल्या तलवारी म्यान केल्याने यात अध्यक्ष पदासाठी ॲड.शरद मारुती गुजर यांची बिनविरोध निवड झाली होती.तर उपाध्यक्षपदी ॲड.महेश सुरेशराव भिडे तर सचिव पदी ॲड.परेश श्रीनिवास डागा तर महिला उपाध्यक्ष पदी ॲड.सविता निवृत्ती कदम यांची सह सेक्रेटरी ॲड.महेंद्र रामदास जाधव व खजिनदार ॲड.नितीन प्रताप गिरमे,तर सह सेक्रेटरी ॲड.महेंद्र रामदास जाधव व खजिनदार ॲड.नितीन प्रताप गिरमे आदींची बिनविरोध निवड झाली होती.तथापि पदग्रहण समारंभ तसाच बाकी होता.आज त्यास मुहूर्त लाभलेला असताना अचानक वकील संघाचे एक कनिष्ठ सहकारी यांचे दुःखद निधन झाले होते.त्यामुळे डामडौलात संपन्न होणारा पदग्रहण समारंभ वकील संघाने साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला होता.त्यानुसार वकील संघाचे मावळते अध्यक्ष ॲड.अशोकराव वहाडणे यांनी साध्या कार्यक्रमात आपले अध्यक्षपद नूतन अध्यक्ष अध्यक्ष शरद गुजर व त्यांच्या अन्य सहकाऱ्यांकडे सोपवले आहे.त्यांचाच कित्ता अन्य सहकारी नवनिर्वाचित पदाधिकारी उपाध्यक्ष ॲड.महेश सुरेशराव भिडे,महिला उपाध्यक्ष ॲड.सविता निवृत्ती कदम (पोळ),सेक्रेटरी ॲड.परेश श्रीनिवास डागा,सह सेक्रेटरी ॲड.महेंद्र रामदास जाधव व खजिनदार ॲड.नितीन प्रताप गिरमे. आदींनी गिरवला आहे.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ॲड आर.सी.गव्हाणे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ॲड.मैले मॅडम मानले आहे.
दरम्यान नवोदित पदाधिकाऱ्यांचे वकील संघाचे मावळते अध्यक्ष ॲड.अशोकराव वहाडणे,माजी अध्यक्ष ॲड.जयंत जोशी,ॲड एस.एम.वाघ,ॲड.अशोक टुपके,ॲड.सदाफळ, ॲड.दिलीप लासुरे,ॲड.रशिद शेख, ॲड.गुजराथी मॅडम,ॲड.गौरव गुरसळ,ॲड.अतिश आगवन,ॲड.एम.पी.येवले आदींनी अभिनंदन केले आहे.
जाहिराती,जाहीर नोटीससाठी संपर्क -7066 227 227.