निवड
…या ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदाची निवड संपन्न

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या सडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच मीराबाई सुदाम बारहाते यांनी अवर्तानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर काळे गटाच्या अनीता संतोष बारहाते यांची बिनविरोध करण्यात आली आहे.

सडे ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच पडली असून यात अनीता संतोष बारहाते यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी यांनी त्यांची निवडणूक बिनविरोध जाहीर केली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सडे ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या उपसरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया नुकतीच सरपंच आशाताई बारहाते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.यावेळी उपसरपंचपदासाठी निर्धारित वेळेत अनीता संतोष बारहाते यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत असलेले ग्रामसेवक चंद्रकांत जोशी यांनी अनीता संतोष बारहाते यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी सरपंच,सर्व सदस्य व काळे गटाच्या कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित उपसरपंच अनीता संतोष बारहाते यांचा सत्कार केला आहे.
यावेळी सरपंच आशाताई बारहाते,मावळत्या उपसरपंच मीराबाई सुदाम बारहाते,सदस्य नितीन बारहाते,सिध्दार्थ मोकळ,सागर गोरे, मिनाताई कुसाळकर,रावसाहेब बारहाते,बापुराव बारहाते,अशोक बारहाते, गोपीनाथ बारहाते, विजय बारहाते, रमेश वाकचौरे,सुदाम बारहाते,गोकुळ बारहाते, सतिष बारहाते,सुनिल बारहाते,संजय बारहाते, कैलास बारहाते,अनिल बारहाते,रोषण बारहाते,आप्पासाहेब गुंजाळ,प्रभाकर बारहाते,शामराव बारहाते,बाबासाहेब बारहाते, ग्रामसेवक चंद्रकांत जोशी आदी मान्यवरांसह काळे गटाचे कार्यकर्ते व सडे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित उपसरपंच अनीता बारहाते यांचे माजी आ.अशोक काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.