निवड
जागतिक होमिओपॅथिक दिनानिमित्त…या डॉक्टरांचा गौरव

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जागतिक होमिओपॅथिक दिनानिमित्त होमिओपॅथिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनतर्फे कोपरगाव शहरातील होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. राजेंद्र श्रीमाळी यांचा सपत्नीक सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.

दरवर्षी १० एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन,होमिओपॅथीचे संस्थापक डॉ.ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनेमन यांच्या स्मृतींना सन्मानित केले जाते.या दिनाचे निमित्ताने कोपरगाव येथील डॉ.राजेंद्र श्रीमाळी यांना लासलगाव येथे गौरविण्यात आले आहे.
दरवर्षी १० एप्रिल रोजी जागतिक होमिओपॅथी दिन,होमिओपॅथीचे संस्थापक डॉ.ख्रिश्चन फ्रेडरिक सॅम्युअल हॅनेमन यांच्या स्मृतींना सन्मानित केले जाते.हा दिवस समजून घेण्यास आणि धोरणांना आव्हान देतो.या दिवशी लोक वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल डॉ.हॅनिमन यांना आदरांजली वाहतात.शिवाय या क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या वैद्यकांचा सत्कार करण्यात येतो.लासलगाव येथे असा सोहळा डॉक्टर्स असोशिएशनच्या वतीने एम.सी.एच.चे माजी अध्यक्ष व आरोग्य विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ.भालचंद्र ठाकरे आणि लासलगाव डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.स्वप्नील जैन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी व्यासपीठावर मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ.अनिरुद्ध ढोकरे,संधिवात तज्ज्ञ डॉ.अस्मिता ढोकरे डॉ.भरत कांगणे,डॉ.स्वप्नील जैन,मनीषा श्रीमाळी तसेच लासलगाव येथील विविध क्षेत्रातील डॉक्टर्स व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ.श्रीमाळी म्हणाले की,“रुग्णसेवेच्या कार्यात प्रामाणिकपणे काम करत राहिलो,सततचा विद्याभ्यास आणि नवनवीन संशोधन आत्मसात केल्यामुळे रुग्णांचा अधिक चांगल्या प्रकारे उपचार करता येतो.त्यामुळे जबाबदारीही वाढते.काळाच्या ओघात होमिओपॅथीची उपयुक्तता विज्ञानाच्या कसोटीवर सप्रमाण सिद्ध करणे आवश्यक आहे.तेव्हाच हे शास्त्र अधिक प्रभावी ठरेल.यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असल्याचे शेवटी सांगितले आहे.त्यांच्या या सत्कराबाबत सर्वत्र अभिनंदन होत आहे.