निवड
आरोटे यांची नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती!

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
नाशिक जिल्ह्यातील औद्योगिक आणि कामगार क्षेत्रात प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे राहुल आरोटे यांची भारतीय जनता पार्टीच्या कामगार आघाडीच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भाजपची कामगार आघाडी ही कामगार,चालक,मालक यांच्या हितसंबंधांचे रक्षण करत औद्योगिक क्षेत्रातील समन्वय वाढवण्याचे कार्य करत आहे.त्यात आता राहुल अरोटे यांना संधी मिळाली आहे.
भाजप नाशिक जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव यांनी अधिकृत पत्राद्वारे ही घोषणा केली.तर पुण्यातील भाजप कामगार आघाडीच्या मुख्य कार्यालयात कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष ॲड.विजय हरगुडे यांच्या हस्ते राहुल आरोटे यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.
भाजपची कामगार आघाडी ही कामगार,चालक,मालक यांच्या हितसंबंधांचे रक्षण करत औद्योगिक क्षेत्रातील समन्वय वाढवण्याचे कार्य करत आहे.नाशिकसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या औद्योगिक जिल्ह्यात कामगारांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी भाजप कामगार आघाडी कटिबद्ध आहे.
या महत्त्वाच्या जबाबदारीची सूत्रे स्वीकारल्यानंतर राहुल आरोटे यांना अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.आ.सीमाताई हिरे,देवयानी फरांदे,राहुल ढिकले,भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव,ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी,प्रदेश सरचिटणीस रमी राजपूत,नाशिक कामगार आघाडी प्रदेश उपाध्यक्ष डॉ.तुषार जगताप,नाशिक कामगार आघाडीचे शहराध्यक्ष हेमंत नेहेते यांच्यासह अनेक नेत्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.