निवड
खरात यांचा…या मंत्र्यांच्या हस्ते सत्कार !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील कार्यकर्ते अरुण खरात यांचा नुकताच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते सत्कार करण्यात आला आहे.अरुण खरात यांचे सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल रामदास आठवले यांनी घेतली असून आठ दिवसांपूर्वीच अरुण खरात यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सत्कार सोहळ्यास निमंत्रित केले होते.

शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावरती अरुण खरात यांचा सत्कार सोहळा पार पडला असून मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अरुण खरात यांनी यापूर्वी निराधार ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी अरुण खरात यांनी प्रयत्न केले होते.उपेक्षित, वंचित,दुर्लक्षित लोककलावंतांच्या न्याय हक्कासाठी अरुण खरात सतत लढा देत असतात.शिर्डी येथील शासकीय विश्रामगृहावरती हा सत्कार सोहळा पार पडला असून मंत्री रामदास आठवले यांचे हस्ते अरुण खरात यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
सदर प्रसंगी यावेळी श्रीकांत भालेराव,सुरेंद्र थोरात,पप्पू बनसोडे,दिपक गायकवाड,विजय वाकचौरे,भीमा बागुल,सुनील मोकळ,संजय विघे आदी मान्यवर उपस्थित होते.