निवड
…या बँकेच्या अध्यक्षपदाची निवड संपन्न
न्युजसेवा
कोपरगाव- (प्रतिनिधी)
नगर जिल्ह्यात सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रभागी असणाऱ्या गौतम सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी सुनील भास्करराव डोंगरे यांची निवड झाली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी दिली आहे.
गौतम सहकारी बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष बापूराव जावळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर सुनील डोंगरे यांची निवड करण्यात आली आहे.शुक्रवार दि.३१ जानेवारी रोजी अध्यक्षीय अधिकारी नामदेव ठोंबळ तथा सहाय्यक निबंध सहकारी संस्था कोपरगाव यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक संपन्न झाली आहे.
सदर प्रसंगी उपाध्यक्ष पदासाठी सुनील डोंगरे यांच्या नावाची सूचना जेष्ठ संचालक राजेद्र ढोमसे यांनी मांडली.सदर सूचनेस बापूसाहेब वक्ते यांनी अनुमोदन दिले.त्यावेळी निवडणूक अधिकारी नामदेव ठोंबळ यांनी उपाध्यक्षपदी सुनील भास्करराव डोंगरे यांची बिनविरोध निवड झाली असल्याचे जाहीर केले.
गौतम सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बँकेचे मार्गदर्शक माजी आ.अशोक काळे व कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले आहे.
यावेळी बँकेचे अध्यक्ष संजय आगवण, मावळते उपाध्यक्ष बापूराव जावळे व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले आहे.
यावेळी बँकेचे संचालक राजेंद्र ढोमसे,बाबुराव थोरात,श्रीकांत तिरसे,कमलाकर चांदगुडे, बापूसाहेब वक्ते,विजय रक्ताटे,तुकाराम हूळेकर, उत्तम भालेराव,सिंधुबाई रोहोम,रुपाली संवत्सरकर,दत्तात्रय खेमनर,अॅड.मासूम सय्यद,अॅड.शिरिषकुमार लोहकणे,रामराव माळी,शरद होन तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे,प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड,वरिष्ठ अधिकारी नानासाहेब बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
गौतम बँकेचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष सुनील डोंगरे यांचा सत्कार करतांना आ.आशुतोष काळे.समवेत अध्यक्ष संजय आगवण,मावळते उपाध्यक्ष बापूसाहेब जावळे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे,प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड आदी दिसत आहे.